बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

कोणी म्हटलं म्हणून सरकार बरखास्त होत नाही- बाळासाहेब थोरात

मुंबई | सरकारचं कामकाज राज्यघटनेनुसार चालतं. केंद्रात सत्तेत असल्याने कोणी संविधाना पेक्षा मोठं होत नाही. कोणी तशी समजूत करून घेऊ नये. कोणी म्हटलं म्हणून सरकार बरखास्त होत नाही, असं महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी म्हटलं आहे.

कोरेगाव भीमा हिंसाचार तपासाबाबत महाराष्ट्र सरकार राष्ट्रीय तपास यंत्रणा NIA च्या अधिकाऱ्यांना सहकार्य करत नसेल तर राज्य सरकार बरखास्त होऊ शकतं, असं भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी म्हटलं. यावरून बाळासाहेब थोरात यांनी सुधीर मुनगंटीवार यांच्यावर निशाणा साधला आहे.

महाराष्ट्र विकास आघाडीत कोणतीही नाराजी नाही, अशोकराव चव्हाण यांच्या विधानाचा विपर्यास केला गेला आहे. महाराष्ट्र विकास आघाडीचे सरकार किमान समान कार्यक्रमाच्या आधावरच चालेल, असं बाळासाहेब थोरात यांनी स्पष्ट केलं.

दरम्यान, सत्ता गेल्याने भाजपचे नेते वैफल्यग्रस्त झाले आहेत, असं म्हणत बाळासाहेब थोरात यांनी भाजप आणि भाजप नेत्यांवर टीकास्त्र सोडलं आहे.

 

 

ट्रेंडिंग बातम्या-

अजित पवार मुख्यमंत्री असल्यासारखे वागतात; चंद्रकांत पाटलांचं टीकास्त्र

विराट कोहलीचा जबरदस्त स्टंट; व्हिडीओ व्हायरल!

महत्वाच्या बातम्या-

राज ठाकरेंची कोलांटीउडी…. आता म्हणतात ‘माझा CAA ला पाठिंबा नाही’!

लोकांच्या अडीअडचणी आता गावातच सुटणार; बच्चू कडूंचा स्तुत्य उपक्रम

कुणाचीही चौकशी करा, आम्ही नाही घाबरत जा- चंद्रकांत पाटील

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More