Top News

“विधानसभेसाठी ‘वंचित’सह सर्व विरोधी पक्षांना एकत्र आणणार म्हणजे आणणार”

मुंबई | आगामी विधानसभा निवडणुकीत भाजप-शिवसेना युतीला शह देण्यासाठी वंचितसह सर्व विरोधीपक्षांना एकत्र आणणार असल्याचं काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरातांनी म्हटलं आहे.

जे पक्ष संविधानी प्रक्रियेचा आदर करतात तसेच धर्मनिरपेक्षतेला विरोध करणाऱ्या शक्तींविरोधात आहेत. अशा पक्षांना मी एकत्र आणण्याचा प्रयत्न करणार आहे, असं बाळासाहेब थोरातांनी सांगितलंय. ते एका मुलाखतीमध्ये बोलत होते.

लोकसभेला आम्ही वंचितला सोबत घेतलं नाही म्हणून आम्हाला 9 जागा गमवाव्या लागल्या आहेत. मात्र विधानसभेला आम्ही वंचितला सोबत घेण्यासाठी प्रयत्न करणार आहोत.

दरम्यान, मनसेकडून आघाडीत सामिल होण्यासाठी अद्याप कोणताही प्रस्ताव आलेला नाही. तो आल्यास आम्ही केंद्रीय नेतृत्वाकडे पाठवू, असं थोरातांनी सांगितलं आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

-वर्ल्डकपनंतर लगोलग BCCI ने विराट कोहलीला दिला मोठा धक्का!

-पार्थ पवार विधानसभेची निवडणूक लढवणार? अजित पवार म्हणतात..

-‘त्यानं’ षटकार मारला अन् दुर्दैवाने त्याचवेळी त्याच्या गुरूंनी प्राण सोडला!

विमा कंपनीच्या नफ्यात आजपर्यंत कुणी वाटा घेतला??; राजू शेट्टींची घणाघाती टीका

-भारताची महिला क्रिकेटपटू स्मृती मंधानाला ‘अर्जुन पुरस्कार’

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या