Top News महाराष्ट्र मुंबई

“छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज हे आमचं आराध्यदैवत, आदर्शांचा वापर मतांची पोळी भाजण्यासाठी नाही”

मुंबई | छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज यांचे नाव वापरून राजकारण करणाऱ्यांनी आम्हाला छत्रपती संभाजी महाराज समजावून सांगण्याची आवश्यकता नाही, असं काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी म्हटलं आहे.

औरंगाबादच्या नामंतराच्या मुद्यावरून काँग्रेसवर शिवसेना आणि भाजपने विरोध केला होता. याच पार्श्वभूमीवर थोरतांनी आपली प्रतिक्रया देत नामंतराला का विरोध करत आहोत यावर स्पष्टीकरण दिलं आहे.

आम्ही मराठी आहोत आणि छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज हे आमचे आराध्यदैवत आहे. त्यामुळेच आम्ही आमच्या आदर्शांचा मतांची पोळी भाजण्यासाठी वापर करणार नाही. कोणी तो करत असेल तर त्याला कडाडून विरोध करू, असं म्हणत थोरातांनी अप्रत्यक्षपणे भाजपवर निशाणा साधला.

दरम्यान, महानगरपालिकेत सत्तेत असलेल्या या दोघांनीही जनतेचा भ्रमनिरास केला आहे. म्हणूनच निवडणुकीच्या तोंडावर त्यांना नामांतराच्या मुद्द्याचा आधार घ्यावा लागत आहे. औरंगाबादच्या जनतेलाच आज नामांतरापेक्षा विकास महत्वाचा आहे, असंही थोरात म्हणाले.

 

थोडक्यात बातम्या-

‘…म्हणून शिवसेनेने नामांतराचा ‘सामना’ सुरू केला’; बाळासाहेब थोरातांचा शिवसेनेवर पलटवार 

संयुक्त महाराष्ट्राचं स्वप्न पूर्ण होईपर्यंत महाराष्ट्र शांत बसणार नाही- अजित पवार

“शरद पवार यांचा गणेश नाईक यांच्यावर प्रचंड विश्वास होता, पण…”

“…तर मग काँग्रेसला कोपरापासून साष्टांग दंडवत, सत्तेसाठी एवढी लाचारी? कुठे फेडाल ही पापे सारी?”

कर्नाटकव्याप्त प्रदेश महाराष्ट्रात आणणारच- उद्धव ठाकरे

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या