Top News महाराष्ट्र मुंबई

“धवलसिंह यांनी ज्याप्रमाणे बिबट्याची शिकार केली त्याचप्रकारे ते भाजपची शिकार करतील”

coutesy - congres maharashtra twiter handle

मुंबई | माजी सहकारमंत्री स्व. प्रतापसिंह मोहिते पाटील यांचे पुत्र धवलसिंह मोहिते पाटील यांनी आज काँग्रेसमध्ये प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांंच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश केला. यावेळी काँग्रेस नेते धीरज देशमुख यांनी आपली प्रतिक्रिया दिली.

धवलसिंह मोहित पाटील यांच्याकडून कॉंग्रेसला बळ मिळणार आहे. सोलापूरमध्ये कॉंग्रेसची ताकद वाढणार आहे. धवलसिंह यांनी ज्याप्रमाणे बिबट्याची शिकार केली त्याचप्रकारे ते भाजपची शिकार करतील, असं म्हणत धीरज देशमुख यांनी भाजपवर निशाणा साधला.

धीरज देशमुख यांना माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विलासराव देशमुख यांची आठवण आली. काँग्रेसचे विचार कधी संपणार नाही, असं विलासराव नेहमी म्हणत होते. भलेभले संपणार पण कॉंग्रेस संपणार नाही, अशी आठवण धीरज देशमुख यांनी बोलताना सांगितली.

दरम्यान, विधानसभा निवडणुकीत धवलसिंह यांनी राष्ट्रवादीचे माळशिरस मतदारसंघाचे उमेदवार उत्तम जानकर यांचा प्रचारही केला होता. मात्र राष्ट्रवादीने आपली दखल घेतली नसल्याचं सांगत धवलसिंह काही महिन्यांपासून नाराज होते.

 

थोडक्यात बातम्या-

चावटपणा करणाऱ्याची फक्त चौकशीच नाही तर त्याला आत टाका- गुलाबराव पाटील

“भाजपला जेव्हा कुणी विचारत नव्हतं तेव्हा आपल्या कुटुंबाने पक्षाचं काम केलं”

‘देवेंद्रजी, तुम्हाला लवकरच संधी मिळेल’; राष्ट्रवादीच्या ‘या’ नेत्याचं वक्तव्य

“लोकांचा अंत पाहू नका, उद्रेक झाला तर कोण थांबवणार?”

गृहमंत्री जी, तुम्हाला खरंच महिला सन्मानाचा इतका कळवळा असता तर…- चंद्रकांत पाटील

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या