मुंबई | पंतप्रधान मोदींनी आज पुन्हा एकदा जनतेशी संवाद साधला आणि पुन्हा सर्व देशवासीयांना एक आवाहन केलं आहे. यावरून मोदींवर मोठ्या प्रमाणात टीका होत आहे. अशातच काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनीही मोदींवर टीका केली आहे.
देशात कोरोना विषाणूने थैमान घातले असून देश एका गंभीर संकटाचा सामना करत आहे. अशा गंभीर संकटावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काही महत्वाचे धोरणात्मक निर्णय घेण्याची गरज आहे. दिवे लावा, टाळ्या वाजवा असे आवाहन करण्याचे काम पंतप्रधानांचे नसून त्यांनी आतातरी गंभीर व्हायला हवे, अशी खरमरीत टीका बाळासाहेब थोरात यांनी केली आहे.
कोरोनाचा सामना करण्यासाठी डॉक्टर, मेडीकल स्टाफ, पोलीस यंत्रणेसह सर्वजण आपला जीव धोक्यात घालून काम करत आहेत. त्यांच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहून त्यांना आवश्यक असलेली मदत करणे ही आजची गरज आहे. त्यासाठी केंद्र सरकारकडून भरघोस आर्थिक मदतीबरोबर सर्वप्रकारचे सहाय्य देण्यास प्राधान्य देणे हे त्यांचे काम आहे, असं थोरातंनी सांगितलं आहे.
दरम्यान, दिवे लावणे, टाळ्या वाजवणे असे इव्हेंट करणे नाही. हे सर्व पाहता नरेंद्र मोदी पंतप्रधान असल्यासारखे वागणार आहेत का? असा सवाल उपस्थित होत असल्याचं थोरात यांनी म्हटलं आहे.
थाळी-टाळीनंतर आता दिवे लावण्याचा कार्यक्रम सादर होत आहे. देशाला इव्हेंटची नव्हे तर रुग्णालयं, व्हेंटिलेटर #COVIDー19 चाचणी लॅबची गरज आहे. हातावर पोट असलेले मजूर व कामगारांना दोन वेळचं जेवण हवं आहे. त्यामुळं @PMOIndia हे प्रसिद्धी स्टंट बंद करून काहीतरी ठोस पावलं उचला.@INCIndia pic.twitter.com/bqQjFn5RBC
— Balasaheb Thorat (@bb_thorat) April 3, 2020
ट्रेंडिंग बातम्या-
“तबलिगी जमातीच्या सदस्यांना गुन्हेगारांप्रमाणे वागवू नये.. ही सरकारची जबाबदारी”
मोदीसाहेब, आपण पंतप्रधान आहात की इव्हेंट मॅनेजर??- रूपाली चाकणकर
महत्वाच्या बातम्या-
केंद्राने धान्य देताना कोणतीच अट ठेवली नाही मात्र राज्य सरकारने अटी ठेवल्या आहेत- फडणवीस
“बाकी देशाचे पंतप्रधान उपचार शोधत आहेत आणि आमचे टाळ्या वाजवायला अन् मेणबत्या पेटवायला सांगतायेत”
उस्मानाबादमध्ये कोरोनाचा शिरकाव; मुंबईतील ताज हॉटेलमधून गावी आलेला वेटर पॉझिटिव्ह
Comments are closed.