मुंबई | मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्यानं काँग्रेसचे भोरचे आमदार संग्राम थोपटे यांच्या समर्थकांनी काल पुण्यात काँग्रेस भवनाची तोडफोड केली. मात्र संग्राम थोपटेंनी मला याबद्दल कल्पना नसल्याचं म्हटलं आहे. यानंतर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष आणि मंत्री बाळासाहेब थोरात यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे. माध्यमांशी ते बोलत होते.
संग्राम थोपटे एक पक्षनिष्ठ कार्यकर्ता आहे. त्यांंना मंत्रिपद देऊ शकलो नाही. कार्यकर्त्यांना राग आहे. मी संग्राम थोपटेंशी बोललो. त्यांचा योग्य वेळी योग्य सन्मान केला जाईल. आमच्या कुटुंबातील ही गोष्ट आहे, असं बाळासाहेब थोरातांनी म्हटलं आहे.
संग्राम थोपटे चांगला आमदार आहे. त्यांचे वडीलही मंत्रिमंडळात होते. मात्र महाराष्ट्रात तीन पक्षांचं सरकार आहे. त्यामुळे वाट्याला आलेल्या जागांचा ताळमेळ घालताना कसरत करावी लागते हे खरं आहे, असंही थोरातांनी म्हटलं आहे.
दरम्यान, कोणी दगडफेक केली, याची वस्तुस्थिती तपासली पाहिजे. हे कार्यकर्ते शहरातले आहेत की ग्रामीण भागातील आहेत, हे तपासावे लागेल. त्याचबरोबर आम्हाला बदनाम करण्यासाठी विरोधी पक्षातील कोणाचं कटकारस्थान आहे का?, याचा शोध घेणार असल्याचं, संग्राम थोपटेंनी म्हटलं आहे.
महत्वाच्या बातम्या-
केंद्र सरकारकडून सर्वसमान्यांना ‘न्यू इअर गिफ्ट’; पहिल्याच दिवशी गॅस दरवाढीचा दणका! – https://t.co/GAIDIuXV9P @narendramodi
— थोडक्यात (@thodkyaat) January 1, 2020
खातेवाटपात नाराजीनाट्य; बाळासाहेब थोरात उद्धव ठाकरेंच्या भेटीला https://t.co/3VGjm1FgXj @bb_thorat @OfficeofUT @ShivSena @INCMaharashtra #म
— थोडक्यात (@thodkyaat) January 1, 2020
संजय राऊत अजूनही नाराज?; फेसबुकवर केली ‘ही’ पोस्ट – https://t.co/k9ZogqHaVG @rautsanjay61 @ShivSena @uddhavthackeray @INCMaharashtra @NCPspeaks
— थोडक्यात (@thodkyaat) January 1, 2020
Comments are closed.