बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘ओबीसी असल्याने मला  महसूल खातं मिळालं नाही’; वडेट्टीवारांच्या वक्तव्यावर थोरात म्हणाले….

मुंबई | ओबीसी आरक्षणावरून राज्यातील राजकारण तापताना दिसत आहे. येत्या तीन महिन्यात ओबीसींना आरक्षण नाही मिळवून दिलं तर राजकारणातून सन्यास घेईल, असं विरोधी पक्षनेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं होतं. यानंतर ठाकरे सरकारमधील काँग्रेस नेते आणि मंत्री विजय वडेट्टीवारांनी आपण ओबीसी असल्याने महसूल खात दिलं गेलं नसल्याचं म्हटलं आहे. यावर काँग्रेसचे मंत्री आणि माजी प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी वडेट्टीवारांना सबुरीचा सल्ला दिला आहे.

काँग्रेस जातीयवादी पक्ष नाही. सगळ्यांना एकत्र घेऊन जाणारा पक्ष आहे. विजय वड्डेटीवार यांना काही तरी वेगळं बोलायचं असेल. काँग्रेसने वसंतराव नाईक यांना मुख्यमंत्री बनवलं. बॅरिस्टर अंतुले यांना संधी काँग्रेसने दिली. वड्डेटीवार यांचं वय पाहिलं तर त्यांना मोठी संधी पुढच्या काळात मिळेल, थोडी वाट पाहावी लागणार असल्याचं बाळासाहेब थोरात म्हणाले.

मी विरोधी पक्षनेता होतो आणि ओबीसींचं नेतृत्व करतो. त्यामुळे मला वाटलं महसूल खातं मिळेल पण हे खातं भेटलं कारण मी ओबीसी आहे ना, असं विजय वडेट्टीवार यांनी म्हटलं होतं

मी स्व.गोपीनाथ मुंडे यांचा शिष्य आहे. भाजप नेत्या पंकजा मुंडे आणि मी गुरुबंधू आहोत. ओबीसींवर अन्याय झाला आहे. तुम्ही आम्ही एकत्र आलो तर हा अन्याय दूर होईल प्रस्थापितांच्या विरोधात लढणं सोपं नाही. भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे माझा नेता ओबीसी आहे, त्यामुळे मला तिकीटाची भिती नाही. मी समाजासाठी झुकायला आणि वाकायला तयार आहे, असंही वडेट्टीवार यांनी सांगितलं. बाळासाहेब थोरातांच्या प्रतिक्रियेवर वडेट्टीवार काय बोलतात याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

थोडक्यात बातम्या- 

डेल्टा प्लस व्हेरिएंटची चिंता करू नका; CSIR शास्त्रज्ञांनी केला मोठा खुलासा, म्हणतात…

तुझ्यात जीव रंगला’ मधील वहिणीसाहेबांच्या बाळाचा चेहरा अन् नाव आलं समोर

सकारात्मक बातमी! देशातील नव्या कोरोनाबाधितांची संख्या 50 हजारांच्या खाली, पाहा आकडेवारी

“20 टक्के लसीकरण झालेल्या देशात कोरोनाची तिसरी लाट नाहीच”

डेल्टा प्लस व्हेरिएंटचा सर्वाधिक धोका महाराष्ट्रालाच का?; तज्ज्ञांनी दिली महत्वाची माहिती

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More