बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

आदित्य ठाकरेंना पर्यावरण खातं कसं मिळालं? बाळासाहेब थोरातांनी सांगितला ‘तो’ किस्सा, म्हणाले…

अहमदनगर | स्वातंत्र्यसेनानी भाऊसाहेब थोरात यांच्या संकल्पनेतून सुरू झालेल्या दंडकारण्य अभियानाचा सोहळा आज संगमनेर तालुक्यातील पिंपरणे येथे आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी राज्याचे महसुल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी आदित्य ठाकरे आणि विश्वजीत कदम यांचं कौतूक केलं. तर आदित्य ठाकरे यांना पर्यावरण खातं कसं मिळालं याबद्दल एक किस्सा बाळासाहेब थोरात यांनी सांगितला.

महाराष्ट्राच्या नेतृत्वाबाबत आदित्य ठाकरेंशी मला चर्चा करायची होती. तेव्हा त्यांना मी विचारलं की तुम्हाला कोणतं खातं पाहिजे? तेव्हा त्यांनी पर्यावरण आणि पर्यटन खातं घेतो, असं सांगितलं होतं. मुंबई महानगरपालिकेचं पर्यटन आदित्य ठाकरेंनी सुरू केलं. पर्यावरणाच्या बाबतीत झाडं, फुलं, पानं, फळ यांची आपल्यापेक्षा जास्त माहिती आदित्य ठाकरे यांना आहे, असं बाळासाहेब थोरात म्हणाले.

पतंगराव कदम यांच्या अचानक जाण्यानं विश्वजीत कदम यांच्यावर एकदमच जबाबदारी आली. सुरूवातीला जरा काळजी वाटली, परंतु विश्वजीत कदम यांनी निवडणुक जिंकल्यानंतर काळजी करण्याची गरज वाटली नाही. आदित्य ठाकरे आणि विश्वजीत कदम यांना पुढील काळात देशपातळीवर काम करण्याची जबाबदारी पडेल, असंही यावेळी बाळासाहेब थोरात यांनी सांगितलं.

दरम्यान, भाऊसाहेब थोरात यांच्या संकल्पनेतील दंडकारण्य अभियान सोहळ्याचे यंदा 16 वर्षे आहे. 50 एकरावर आपण 157 प्रकाराची झाडं लावली आहेत. त्यानंतर पाच वर्षानंतर आपण याच झाडाखाली कार्यक्रम घेऊ, असंही बाळासाहेब थोरात म्हणाले.

थोडक्यात बातम्या- . 

इंदिरा गांधींना माहित होतं की त्यांची हत्या होऊ शकते, तरीही…; प्रियंका गांधीचं मोठं वक्तव्य

नवाजुद्दीन सिद्दीकीने ‘या’ कारणामुळे सोडला ओटीटी प्लॅटफॉर्म; चाहत्यांना बसला मोठा धक्का

परमबीर सिंह कुठे गायब आहेत?, ‘या’ नेत्याने दिलं उत्तर

नवाब मलिकांचा देवेंद्र फडणवीसांवर घणाघाती हल्ला, गंभीर आरोप करत म्हणाले…

“त्यांनी लवंगी फटाके फोडले, मी 3 जावयांचे दिवाळीत एकदमच बॉम्ब फोडणार”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More