बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“राष्ट्रवादीने आता पवारसाहेबांवर जास्त हक्क सांगू नये”

अहमदनगर | राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार, महसुलमंत्री बाळासाहेब थोरात, जलसंपदा मंत्री जयंत पाटील आणि ग्रामविकास मंत्री हसन मुश्रिफ यांच्या उपस्थितीत श्रीगोंदा तालुक्यातील माजी आमदार शिवाजीराव नागवडे यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचा अनावरण सोहळा पार पडला.

या कार्यक्रमात महसुलमंत्री बाळासाहेब थोरात हे जुन्या आठवणींना उजाळा देत मिश्कील टिप्पणी करताना दिसले. यावेळी बोलताना राष्ट्रवादीने आता पवार साहेवांवर जास्त हक्क सांगू नये, असं थोरातांनी म्हटलं. तर शरद पवार कृषीमंत्री असतानाचा किस्साही थोरात यांनी सांगितला,

थोरात म्हणाले की, पवारसाहेब कृषीमंत्री होते तेव्हा मी राज्यात कृषीमंत्रीपद मागून घेतलं होतं. कारण वर पवारसाहेब असल्याने खाली काही कमी पडणार नाही हे मला माहिती होतं. मला शेतीतीलसमजावं या उद्देशाने मला शेजारी बसवून ते संपुर्ण राज्यातील कृषी मंत्र्यांशी चर्चा करायचे, असंही थोरात म्हणाले.

त्यामुळे आता राष्ट्रवादी काँग्रेसनं पवार साहेबांवर जास्त हक्क सांगू नये. किती दिवस शरद पवारांचा तुम्ही आधार घेणार, अशी टिप्पणी बाळासाहेब थोरातांनी केली. तर नगर जिल्ह्याला अनेक नेत्यांना एकत्र ठेवलं. कोण मोडत असेल तर त्याला उभं करणारी माणसं नगरमध्ये होती म्हणत नगर उभारणीत योगदान दिलेल्या नेत्यांचेही थोरातांनी आभार मानले.

थोडक्यात बातम्या-

मोठी बातमी! अनिल देशमुखांना न्यायालयाचा झटका

“नवाब मलिक बोलना बंद नही करेगा तो तेरा बेटा लंबा जायेगा”

“नवाब मलिकांना हे आजच कसं सुचलं? एक महिना काय झोपले होते का?”

‘क्रुझ पार्टीसाठी महाविकासआघाडी सरकारमधील ‘या’ मंत्र्यालाही निमंत्रण’; मलिकांचा मोठा गौप्यस्फोट

मोहित कंबोज हाच आर्यन खान किडनॅपिंग प्रकरणाचा मास्टरमाइंड- नवाब मलिक

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More