Top News

शिवसेना नगरसेवकांचा राष्ट्रवादीत प्रवेश, बाळासाहेब थोरात म्हणाले…

अहमदनगर | पारनेर नगरपंचायतमधील शिवसेनेच्या पाच नगरसेवकांनी नुकतंच राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. यावर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरातांनी प्रतिक्रिया दिली आहे.

आघाडीत कोणतीही बिघाडी नाही, असं बाळासाहेब थोरातांनी स्पष्ट केलं आहे. ते अहमदनगरमध्ये बोलत होते. तसेच बाळासाहेब थोरातांनी यावेळी बोलताना विरोधकांवर टीका केली आहे.

महाविकास आघाडी भक्कम आहे. सर्व मंत्री एकत्रितपणे काम करत आहेत. मात्र, काही लोक आघाडीत बिघाडी होण्याची वाट पाहत आहेत, असा टोला बाळासाहेब थोरात यांनी लगावला आहे.

दरम्यान, आम्ही शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा दुसरा हप्ता देण्याची उपाययोजना करत आहोत. या कामात बऱ्याच अडचणी आहेत. पण अडचणीतून चांगला मार्ग काढण्याचा आमचा प्रयत्न आहे, असंही बाळासाहेब थोरात यांनी यावेळी सांगितलं.

ट्रेंडिंग बातम्या-

‘आत्मनिर्भर महाराष्ट्र-आत्मनिर्भर भारत‘; देवेंद्र फडणवीस यांचं आणखी एक पुस्तक प्रकाशित

आमदाराच्या वडिलांच्या अंत्यविधीला 10,000 लोक; तीन गावं करावी लागली सील

महत्वाच्या बातम्या-

एकतर्फी प्रेमातून नववधूची लग्नाच्याच दिवशी हत्या, ब्यूटी पार्लरमध्ये घुसून चिरला गळा

106 वर्षांच्या आजोबांची कोरोनावर मात, ठणठणीत होऊन परतले घरी

संजय राऊतांनी 12 आमदारांची नव्हे तर महाराष्ट्राची काळजी करावी- देवेंद्र फडणवीस

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या