Top News अहमदनगर महाराष्ट्र

कोणाच्या पाठीत कोणाचा खंजीर?; बाळासाहेब विखेंचा शरद पवारांवर गंभीर आरोप

अहमदनगर | सत्तेसाठी आणि सत्तेपुरतं राजकारण करण्याच्या परंपरेला महाराष्ट्रात शरद पवार यांनी सुरुवात केली. त्यांच्यामुळेच व्यक्तीगत राजकीय बळ आणि महत्त्वाकांक्षेला महत्त्व आलं, असं दिवंगत बाळासाहेब विखे पाटील यांनी आपल्या आत्मचरित्रात लिहिलं आहे. नुकतंच देह वेचावा कारणी या त्यांच्या आत्मचरित्राचं प्रकाशन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पार पडलं. या आत्मचरित्रात त्यांनी शरद पवार, वसंतदादा पाटील, पुलोद सरकार आणि खंजीर यावर विस्तृत भाष्य केलं आहे.

शरद पवारांनी पुलोद सरकार कसं आणलं, याचा संपूर्ण घटनाक्रम बाळासाहेब विखे पाटील यांनी या पुस्तकात लिहिला आहे. त्यानंतर ते लिहितात, “पवारांनी पुलोदचा प्रयोग करुन मुख्यमंत्रिपद मिळवलं खरं, मात्र त्यानंतर महाराष्ट्रातील राजकारणानं सर्वार्थानं घातक वळण घेतलं. पक्षापेक्षा व्यक्तीगत राजकीय बळ आणि महत्त्वाकांक्षेला महत्त्व आलं.”

“सत्तेसाठी व सत्तेपुरतं राजकारण करण्याची नवी परंपरा महाराष्ट्रामध्ये सुरु झाली. सत्तेसाठी सर्वकाही हा नवा मंत्र महाराष्ट्राच्या राजकारणात रुजला. शत्रू आणि मित्र बदलत राहिले. परंपरागत विरोधी पक्षाऐवजी मूळच्या काँग्रेसी नेत्यांच्या गटामध्येच संघर्षाचं, स्पर्धेचं राजकारण वाढीला लागलं.”

“खरंतर शरदरावांना महाराष्ट्राच्या प्रश्नांची अतिशय चांगली समज आहे. मुख्यमंत्री झाले तेव्हा त्यांच्याविषयी चांगलं मत होतं. जनतेच्या अपेक्षा उंचावल्या. राज्याच्या कानाकोपऱ्यातील कार्यकर्त्यांशी त्यांचे असणारे व्यक्तिगत संबंध ही त्यांची मोठी ताकद! राज्याच्या राजकारणाला, समाजकारणाला विधायक वळण देवून विकासकामांची गती वाढवण्याची त्यांची क्षमता होती आणि आहे. तशी संधीही त्यांना मिळत गेली. परंतु त्यांच्यातील राजकारण्यानं, त्यांच्या स्वभावानं व वागण्यानं या सगळ्यावर मात केली. “

महत्त्वाच्या बातम्या-

शरद पवारांच्या आत्मचरित्रात असत्य माहिती; बाळासाहेब विखेंच्या आत्मचरित्रात धक्कादायक आरोप

राज्यपालांच्या विचारांशी राष्ट्रपती सहमत आहेत का?, बाळासाहेब थोरातांचा सवाल

पहिल्या घरातील गोष्टी निस्तरा; नितेश राणेंचा मुख्यमंत्र्यांवर घणाघात

भुजबळांनी माझं भाषण त्यांच्या नेत्यांसोबत बसून ऐकावं- खासदार संभाजीरीजे

‘हे’ राज्यात मोगलाई अवतरल्याचं लक्षण; चंद्रकांत पाटील यांची मुख्यमंत्र्यांवर टीका

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या