नाना पटोले अडचणीत?; ‘या’ बड्या नेत्याची थेट हायकमांडकडे तक्रार

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

मुंबई | काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) हे सध्या अडचणीत सापडले आहेत. सत्यजित तांबे (Satyajit Tambe) यांच्यानंतर आता काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनीही पटोले यांना घेरलं आहे.

थोरातांनी पटोलेंची थेट हायकमांडकडे तक्रार केली आहे. बाळासाहेब थोरात यांनी काँग्रेस (Congress) हायकमांडला पत्र लिहिलं आहे. त्यात त्यांनी थेट नाना पटोले यांची तक्रार केली आहे.

नाना पटोले यांच्यासोबत काम करणं अशक्य असल्याचं थोरात यांनी हायकमांडला कळवल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे पटोले प्रचंड अडचणीत सापडल्याची चिन्हे दिसत आहेत.

नाना पटोले यांच्यासोबत काम करणं अशक्य झालंय. तसेच असंच सुरू राहिल्यास काँग्रेसमध्ये दोन गट पडतील, असा इशाराही बाळासाहेब थोरात यांनी पत्रातून दिल्याचं कळतंय.

दरम्यान, सत्यजित तांबे यांनी नाशिक पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत पक्षातून बंडखोरी केली होती. त्यांनी अपक्ष म्हणून ही निवडणूक लढवली.

तांबेंच्या विरोधात महाविकास आघाडीच्या उमेदवार म्हणून शुभांगी पाटील उभ्या होत्या. पाटील यांना काँग्रेसचा पाठिंबा होता. या निवडणुकीत सत्यजित तांबे विजयी झाले.

महत्त्वाच्या बातम्या-