बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘विमानतळाला बाळासाहेबांचं नाव देणं हा उद्धव ठाकरेंचा बालहट्ट’; भाजप नेत्यांसोबत मनसे आमदार मैदानात

मुंबई | नवी मुंबई अंतरराष्ट्रीय विमानतळाला दि. बा. पाटील यांचं नाव द्यावं, ही मागणी आता जोर धरु लागली आहे. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिवंगत दि. बा. पाटील यांचं नाव देण्यात यावं, अशी मागणी ठाणे, रायगड, पालघरमधील स्थानिक भूमीपुत्रांनी मांडली आहे. त्यावरून आता स्थानिक विरूद्ध शिवसेना असा वाद रंगला आहे. त्यात आता मनसेचे आमदार राजू पाटील यांनी स्थानिकांच्या बाजूने उडी घेतली आहे.

नवी मुंबईच्या प्रस्तावित विमानतळाला बाळासाहेब ठाकरे यांचं नाव देण्याचा आग्रह म्हणजे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा बालहट्ट आहे. उद्धव ठाकरे हे मोठे नेते आहेत. पण त्यांना स्थानिक भूमीपुत्रांबद्दल अजिबात आस्था नाही. भाजप या मुद्द्यावर राजकारण अजिबात करत नाही, परंतु आम्ही स्थानिक भूमीपुत्रांच्या सोबत आहोत, अशी प्रतिक्रिया भाजप नेते रविंद्र चव्हाण यांनी दिली आहे.

नवी मुंबई विमानतळाला दि.बा. पाटील यांचं नाव दिलं पाहिजे. स्थानिक भूमिपुत्र म्हणून ही आमची प्रमुख मागणी आहे, अशी प्रतिक्रिया मनसे आमदार राजू पाटील यांनी दिली आहे. काही दिवसांपुर्वी राज ठाकरे यांनी नवी मुंबई विमानतळाला छत्रपती शिवाजी महाराजांचंच नाव देण्याच येईल, यात वादविवाद करून अर्थ नाही, अशी प्रतिक्रिया दिली होती. तर राजू पाटील यांनाही माझी यांची भूमिका पटली असल्याचं राज ठाकरे यांनी सांगितलं होतं.

दरम्यान, विमानतळाला दि. बा. पाटील यांचे नाव देण्याच्या मागणीसाठी प्रकल्पग्रस्त भूमिपुत्रांनी गुरुवारी सकाळपासून सिडको घेराव आंदोलन सुरु केलं आहे. या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर नवी मुंबईतील सिडको कार्यालयाबाहेर कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. हातात दि.बा.पाटील यांच्या नावाच्या समर्थनार्थ पोस्टर, झेंडे घेत आंदोलनकर्ते मोर्चात सहभागी झाले आहेत.

थोडक्यात बातम्या-

‘फक्त 2 औषधं घेतली आणि कोरोना बरा झाला’; मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांचा दावा

“आदित्यजी, वडिलांकडे हट्ट धरा, हवंतर बाळासाहेबांचं नाव द्या पण ते काम पूर्ण करा”

राजगडावर रोपवे होणार का?; आमदार संग्राम थोपटेंनी दिलं हे स्पष्टीकरण

नाना पटोले तातडीने दिल्ली दरबारी, ‘स्वबळाची भाषा’ कारण?

‘लस न घेतलेल्या आमदारांना विधानसभेत प्रवेश नाही’; बिहार विधानसभा अध्यक्षांचं फर्मान

Shree

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More