बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘बाळासाहेबांनी लतादीदींना दिलेली राजकारणात येण्याची ऑफर’; वाचा ‘तो’ भन्नाट किस्सा

मुंबई | भारताच्या गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांचं रविवारी दुःखद निधन झालं आहे. वयाच्या 92 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. लतादीदींच्या निधनानं संपूर्ण जगभरात शोककळा पसरली आहे. लता मंगेशकर यांच्या निधनानंतर त्यांचे अनेक फोटो व्हिडीओ आणि जुने किस्से व्हायरल होत आहेत. अशातच लता मंगेशकर आणि ठाकरे कुटुंबीयांचा एक जुना किस्सा व्हायरल होत असलेला पहायला मिळत आहे.

लता मंगेशकर आणि ठाकरे कुटुंबियांचे संबंध खूप जवळचे आहेत. बाळासाहेब लतादीदींना बहीण मानायचे, त्यांचं आणि लतादीदींचं एक खास नातं होतं. दोघांना एकमेकांना भेटायला फारसा वेळ मिळत नसला तरी दोघे एकमेकांच्या वाढदिवसाला भेटायचे. एकदा ठाकरे आणि मंगेशकर हे दोन्ही कुटुंब एकत्र आलं असताना बाळासाहेबांनी लतादीदींना राजकारणात येण्याची ऑफरही दिली होती. हा किस्सा चांगलाच चर्चेत आला होता.

“बाळासाहेब, राजकारण हा आमचा प्रांत नाही. परंतू तुम्ही राजकारणाच्या माध्यमातून चांगलं काम करत आहात, त्यासाठी माझ्या शुभेच्छा”,बाळासाहेबांनी लतादीदींना दिलेली राजकारणात येण्याची ऑफर, असं उत्तर देत लतादीदींनी बाळासाहेबांना राजकारणात येण्यास नकार दिला होता. बाळासाहेबांनादेखील लतादीदींचे हे उत्तर आवडलं होतं.

दरम्यान, बाळासाहेबांच्या निधनानंतरही मंगेशकर आणि ठाकरे कुटुंबियांचे संबंध चांगले आहेत. बाळासाहेबांचे अंत्यसंस्कार झालेल्या शिवाजी पार्कमधेच लतादीदींचेही अंत्यसंस्कार करण्यात आले आहेत.

थोडक्यात बातम्या – 

लता मंगेशकर व्हेंटिलेटवर असतानाही ऐकत होत्या ‘या’ व्यक्तीची गाणी

‘या’ ठिकाणी भारतीय लष्कराचे सात जवान अडकले, रेस्क्यू ऑपरेशन सुरू

शाहरुख खानला ट्रोल करणाऱ्यांना उर्मिला मातोंडकरचं सडेतोड उत्तर, म्हणाल्या…

“एक हजार पाकिस्तानही लतादीदींच्या जाण्याची पोकळी भरुन काढू शकत नाही”

“मनसुख हिरेन यांच्या हत्येनंतर माझ्या हत्येचा कट ठाकरे सरकार रचत आहे”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More