महाराष्ट्र मुंबई

मुंबईत दिग्गजांच्या उपस्थितीत उद्धव ठाकरेंच्या हस्ते बाळासाहेबांच्या पुतळ्याचं अनावरण!

मुंबई | शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या 95 व्या जयंतीनिमित्त त्यांच्या पुतळ्याचं अनावरण करण्यात आलं. बाळासाहेब ठाकरेंचा पूर्णाकृती पुतळा कुलाबा परिसरातील श्यामाप्रसाद मुखर्जी चौकात उभारण्यात आला आहे.

या पुतळ्याचे लोकापर्ण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आलं. या कार्यक्रमासाठी सर्वच पक्षातील राजकीय दिग्गजांनी हजेरी लावली.

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा पुतळा अनावरणाच्या कार्यक्रमात वेगवेगळ्या मुद्द्यांवरुन एकमेकांवर आरोपांचे फैरी झाडणारे नेते एकत्र आल्याचं पाहायला मिळालं.

या कार्यक्रमाला राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, मनसे अध्यक्ष राज ठाकरे, अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे, खासदार संजय राऊत, महापौर किशोरी पेडणेकर, रश्मी ठाकरे, नीलम गोऱ्हे, मंत्री उदय सामंत, अमित ठाकरे आणि अनेक मंत्री, आमदार आणि खासदार उपस्थित होते.

थोडक्यात बातम्या-

“शशिकांत शिंदेंचा शंभर कोटींचा दावा हा सर्वात मोठा राजकीय विनोद”

‘रेणू शर्मावर गुन्हा दाखल करा’; चित्रा वाघ यांनी घेतली विश्वास नांगरे पाटलांची भेट

पगार न मिळाल्याने संतापलेल्या ड्रायव्हरने एकापाठोपाठ पाच लक्झरी बसेस पेटवल्या!

‘नोटेवरील गांधींचा फोटो बदलून शिवाजी महाराजांचा लावावा’; संभाजी भिंडेंची मागणी

देशाला किमान चार राजधान्या हव्यात- ममता बॅनर्जी

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या