Hair loss virus l सध्या चीनमध्ये HMPV या व्हायरसने धूमाकूळ घातला असून भारतात देखील या व्हायरसचे रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे आता महाराष्ट्र सरकार देखील अलर्ट मोडवर आहे. मात्र आता राज्यात पुन्हा एका आजाराने डोकं वर काढलं आहे, यावेळी बुलढाणा जिल्ह्यातील शेगांव तालुक्यात एका अज्ञात व्हायरसने प्रचंड धूमाकूळ घातला आहे. या व्हायरसमुळे अवघ्या 3 दिवसात चक्क टक्कल पडत असल्याच्या घटना घडल्या आहेत. त्यामुळे नागरिक प्रचंड प्रमाणात भयभीत झाले आहेत.
टक्कल व्हायरस वेगाने फोफावतोय :
शेगाव तालुक्यातील बोंडगाव, कालवड, हिंगणा या गावातील नागरिकांना अज्ञात आजाराची लागण झाली आहे. सध्या या गावात टक्कल व्हायरसने मोठ्या प्रमाणात धुमाकूळ घातला आहे. टक्कल व्हायरसमुळे अनेक लोकांना डोक्यावरील केस गमवावे लागत आहेत. या आजाराची लक्षण म्हणजे आधी डोक्याला खाज सुटते, नंतर केस गळून हातात येतात आणि त्यानंतर तिसऱ्याच दिवशी चक्क टक्कल पडत आहे.
मात्र आता टक्कल व्हायरस या आजारामुळे शेगाव तालुक्यातील नागरिक मोठ्या प्रमाणात घाबरले आहेत. तसेच धक्कादायक बाब म्हणजे शेगावजवळील अनेक गावांत हा व्हायरस मोठ्या पसला असून त्यामध्ये अनेक नागरिकांनी केस गमवले आहेत. तसेच यामध्ये पुरुषांसह महिलांची संख्याही लक्षणीय आहे.
Hair loss virus l या आजारामुळे नागरिकांमध्ये भीतीच वातावरण :
दरम्यान, या आजाराने नागरिक प्रचंड प्रमाणात धास्तावले आहेत, त्यामुळे केसगळती आणि टक्कलच्या या समस्येपासून वाचण्यासाठी अनेक नागरिक खाजगी रुग्णालयात उपचार घेत आहेत. मात्र अचानकपणे टक्कल पडण्याच्या घटना का घडत आहे हे अद्याप समोर आलं नाही.
मात्र केस धुण्यासाठी शांपू वापरल्यामुळे हा प्रकार घडून केसगळती आणि टक्कल पडत असावे असं डॉक्टरांचं मत आहे. परंतु, ज्या नागरिकांनी आयुष्यात कधीच शांपू वापरलेला नाही, अशा लोकांचे सुद्धा केस जात असल्यामुळे नागरिकांमध्ये मोठ्या प्रमाणात खळबळ उडाली आहे.
News Title – Bald virus outbreak in the state
महत्त्वाच्या बातम्या –
जाणून घ्या पुढील 10 दिवस राज्यातील हवामान कसं असणार?
“कराड सुटून आल्यावर आम्हाला मारणारच, सरकारने…”; मस्साजोग गावकरी प्रचंड दहशतीत?
सुरेश धस अजित पवारांच्या भेटीला, धनंजय मुंडेंच्या वाढणार अडचणी?
‘तारक मेहता..’ फेम ‘या’ अभिनेत्याची तब्येत अत्यंत खराब; फोटो पाहून चाहत्यांना धक्का
साऊथ सुपरस्टारचा दुबईत भीषण अपघात, अपघाताचा थरारक व्हिडिओ व्हायरल