शतकातला सर्वोत्तम चेंडू; हा नाही पाहिला तर काहीच नाही पाहिलं?

पर्थ | मिचेल स्टार्कनं आज अॅशेस मालिकेत टाकलेल्या एका चेंडूची सध्या चांगलीच चर्चा आहे. कुणी हा अॅशेस मालिकेतला सर्वोत्तम चेंडू म्हणतंय तर कुणी याला शतकातला सर्वोत्तम चेंडू म्हणतंय. 

इंग्लंडची धावसंख्या 100 असताना जेम्स व्हिन्सने मिचेल स्टार्कच्या चेंडूचा सामना केला. मात्र दोन सेकंद त्यालाही कळलं नाही नेमकं काय झालंय. तोपर्यंत स्टार्कनं जल्लोष सुरु केला होता. व्हिन्सची दांडी गुल झाली होती. 

स्टार्कच्या या विकेटनंतर सोशल मीडियात या चेंडूंची जोरदार चर्चा सुरु झालीय. अगदी शेन वॉर्नच्या विसाव्या शतकातील सर्वात चांगल्या चेंडूशी त्याची तुलना केली जातेय.