चंद्रपूर | बिहारच्या बक्सरनंतर आता उत्तर प्रदेशातील गाझीपूरमध्येही गंगा नदीच्या किनाऱ्यावर मृतदेह तरंगताना आढळले आहेत. कोरोनामुळे मृत्यु झालेल्या मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्याऐवजी ते नदीत सोडून देण्यात आले होेते. या घटनेमुळे दोन्ही राज्यातील सरकार जागं झालं आहे. यावरून राज्य सरकारवर टीका होताना दिसत आहेत. अशातच काँग्रेस पक्षाचे महाराष्ट्रातील एकमेव खासदार असलेले बाळू धानोरकर यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला आहे.
पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वात ‘नमामि गंगे’ ऐवजी ‘शवामी गंगे’, अशा शब्दात बाळू धानोरकर यांनी नरेंद्र मोदींवर निशाणा साधला आहे. भारताची मान शरमेनं खाली गेली आहे. हा संपुर्ण भारतवासियांचा जगभरात झालेला अपमान आहे, असंही धानोरकर म्हणाले. कोरोना विरोधी लढ्यात मोदी सरकारनं विरोधी पक्षांना आणि त्यांच्या सुचनांना सामावून घेण्याचं आवाहनही धानोरकरांनी केलं आहे.
गंगा नदीत आतापर्यंत शेकडो मृतदेह प्रवाहात वाहून आल्याचं गाझीपूर आणि बक्सरमध्ये दिसून आलं. त्यातील काही मृतदेह हे अर्धवट जळालेल्या अवस्थेत होते. गंगा नदीत आढळून आलेल्या मृतदेहांच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस नेत्या आणि उत्तर प्रदेशच्या काँग्रेस महासचिव प्रियंका गांधी यांनीही केंद्र सरकार आणि पंतप्रधान मोदींवर टीका केली आहे.
दरम्यान,मिळालेल्या माहितीनुसार बलिया, गाझीपूरमध्ये मृतदेह वाहून जात आहेत. तर उन्नावमध्ये नदी किनाऱ्यावर शेकडो मृतदेह पुरले जात आहेत. लखनऊ, गोरखपूर, झांरी, कानपूर, अशा शहरांमधील मृत्यूचा आकडा अनेक पटींनी कमी करुन सांगितला जात आहे. या प्रकाराचा उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांच्या देखरेखीखाली न्यायिक तपास झाला पाहीजे, अशी मागणी प्रियंका यांनी केली आहे.
थोडक्यात बातम्या-
राजस्थानमधील अनोखा विवाह! बलात्काराच्या आरोपीने पीडितेशी पोलीस ठाण्यातच बांधली लगीनगाठ
‘माझी विकेट फक्त…’; या मराठी अभिनेत्रीच्या फोटोवर केलेल्या ‘खास’ कमेंटमुळे ऋतुराज गायकवाड चर्चेत
भावाच्या लग्नासाठी ठेवलेल्या पैशातून घेतले ऑक्सिजन सिलेंडर, 25 कोरोना रुग्णांना जीवनदान
देशाचे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा गायब?; दिल्ली पोलीस ठाण्यात बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल
“देशात फक्त तीनच कंपन्यांना परवानगी असताना नागरिकांना ‘ती’ लस कशी दिली जाते”
धक्कादायक! केवळ ओरल सेक्सने 15 वर्षांची मुलगी झाली गर्भवती; घडला ‘हा’ प्रकार
Comments are closed.