बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

रामदास आठवले संतापले; म्हणाले, चीनच्या ‘या’ गोष्टीवर बंदी घाला!

मुंबई | चिनी सैन्यासोबत गलवान खोऱ्यात झालेल्या धुमश्चक्रीत भारताचे 20 जवान शहीद झाल्यानंतर भारतात चीनविरोधात संतापाची लाट उसळली आहे. चिनी वस्तूंवर बहिष्कार टाकावा, असं अनेकाचं मत आहे. यावर रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी भाष्य केलं आहे.

भारतातील चायनीज फूडवर बंदी आणा, अशी मागणी रामदास आठवले यांनी केली आहे. रामदास आठवलेंनी या संदर्भात एक ट्विट केलं आहे.

जगाला शांतीचा संदेश देणाऱ्या भगवान बुद्धांचा धम्म भारतातुन चीनमध्ये आणि सर्व जगात प्रसारित झाला आहे. त्यामुळे भारताने चीनला बुद्ध दिला असून युद्ध दिलेले नाही. आम्हाला युद्ध नको बुद्ध हवा आहे. पण चीनला जर युद्धाची खुमखुमी असेल तर चीनला कायमचा धडा शिकवू, असा इशारा रामदास आठवलेंनी दिला आहे.

चीन हे धोका देणारं राष्ट्र आहे. चीनच्या वस्तुंवर बहिष्कार घालण्याची गरज आहे. चिनी खाद्य पदार्थांवर ही बहिष्कार घातला पाहिजे. चायनीज फूडचे हॉटेल्स आणि चायनीज फूडवर भारतात बंदी घालण्याचं आवाहन आठवलेंनी केलं आहे.

ट्रेंडिंग बातम्या-

“एकुलत्या एक पुत्राने देशासाठी प्राणार्पण केल्याचा आम्हाला अभिमान”

“सीमेवर जे घडलं, त्यासाठी नेहरू, इंदिरा गांधींना किंवा राहुल गांधींना जबाबदार धरू शकत नाही”

महत्वाच्या बातम्या-

ठाकरे सरकार जातीय आणि धर्मवादी, वाढत्या जातीय हल्ल्यांच्या पार्श्वभूमीवर आंबेडकरांची टीका

पोलीस हवालदाराची लेक झाली कलेक्टर; वाचा सातारच्या स्नेहलची थक्क करणारी संघर्षगाथा

पुढचे दोन आठवडे धोक्याचे; जागतिक आरोग्य संघटनेनं दिला ‘हा’ महत्त्वाचा इशारा

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More