नवी दिल्ली | नुकतंच युकेमध्ये कोरोना संसर्गाचा एक नवीन विषाणू आढळून आलाय. यामुळे युकेमध्ये पुन्हा एकदा कडक लॉकडाऊन जाहीर केला गेलाय.
यावरून भारत सरकारने एक मोठा निर्णय घेतलाय. युनायटेड किंग्डममधून भारतात येणाऱ्या विमानांवर येत्या 31 डिसेंबरपर्यंत बंदी आणली आहे. त्यामुळे आता 22 डिसेंबर ते 31 डिसेंबर या कालावधीत ही बंदी असणार आहे.
युकेमध्ये कोरोनाचा नवा विषाणू आढळून आलाय. यासाठीच खबरदारीचा उपाय म्हणून केंद्र सरकारने हा मोठा निर्णय घेतला आहे. या नवीन प्रकारच्या विषाणूचा प्रसार भारतात होऊ नये यासाठी हा निर्णय़ घेण्यात आलाय.
दरम्यान युकेमधील व्हायरस पाहता भारतात येणाऱ्या विमानांवर बंदी घालण्यात यावी, अशी मागणी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल तसंच राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी केली होती.
थोडक्यात बातम्या-
ब्रिटनमध्ये नवा कोरोनाचा विषाणू; पण भारत सरकार म्हटतंय ‘नो टेन्शन’!
शरद पवार जर पंतप्रधान नरेंद्र मोदींना भेटणार असतील तर…; फडणवीसांचं मोठं वक्तव्य!
“ब्रिगेडी हिंदुत्ववाद्यांनी राममंदिर वर्गणीला टार्गेट करणं स्वाभाविकच”
‘…तर पहिला कडेलोट संजय राऊतांचा केला असता’; निलेश राणेंची जहरी टीका
“उद्धवजी, अजूनही वेळ गेलेली नाही, फडणवीसांना सोबत घेऊन मोदीजींना भेटा”