‘पद्मावत’ला होणारा विरोध मावळला, राजस्थानमध्येही झळकणार!

मुंबई | दिग्दर्शक संजय लिला भन्साळींचा ‘पद्मावत’ सिनेमाला अखेर राजस्थान, गुजरात अाणि मध्य प्रदेशमध्ये प्रदर्शित होणार आहे. गुजरात अाणि मध्य प्रदेशमध्ये आजपासून हा सिनेमा दाखवला जाईल, तर राजस्थानमध्ये मात्र एक दोन दिवसांत हा सिनेमा प्रदर्शित होईल. 

राजस्थान, गुजरात अाणि मध्य प्रदेश सरकारने पद्मावतवर बंदी घातली होती. मात्र सर्वोच्च न्यायालयाने अशाप्रकारची बंदी घालता येणार नाही, असं स्पष्ट केलं होतं. त्यानंतर सिनेमा सर्वत्र प्रदर्शित झाला, मात्र हिंसाचारामुळे या राज्यांमध्ये अद्यापही थिएटर मालक हा सिनेमा दाखवण्यास तयार नव्हते. 

दरम्यान, आता या सिनेमाला होणार विरोध मावळला आहे. तसेच राज्य सरकारही सिनेमा दाखवण्यासाठी अनुकूल असल्याचं कळतंय.