Top News राजकारण

…तर नमो अ‍ॅपवरही बंदी घालावी, पृथ्वीराज चव्हाण यांची मागणी

मुंबई | भारतीय नागरिकांची खाजगी माहिती धोक्यात आहे म्हणून केंद्र सरकारने 59 मोबाईल अ‍ॅपवर बंदी घातली. त्यानंतर माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी नमो अ‍ॅपवरही बंदी घाला अशी मागणी केलीये. यासाठी त्यांनी #BanNaMoApp हा हॅशटॅगही त्यांनी ट्रेंड केलाय.

यासंदर्भात ट्विट करत पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, “130 कोटी भारतीयांची खासगी माहिती धोक्यात आहे म्हणून सरकारने 59 मोबाइल अ‍ॅपवर बंदी घातली. याच निकषावर वापरकरर्त्यांची माहिती गोळा करणारे, परस्पर खासगी सेटिंग बदलणारे आणि वापरकर्त्याचा डेटा भारताबाहेरच्या परदेशातील कंपन्यांना पाठवणारे नमो अ‍ॅपही बंद केले पाहिजे.”

 

 

पूर्व लडाखमध्ये झालेल्या संघर्षानंतर भारतात चीन या दोन्ही देशांमध्ये प्रचंड तणाव आहे. अशातच सोमवारी भारताने चीनवर डिजिटल स्ट्राईक करत 59 चिनी अॅप्सवर बंदी घातल्याचं जाहीर केलं. काही दिवसांपूर्वीच भारतीय गुप्तचर यंत्रणांनी 52 धोकादायक चिनी अ‍ॅप्ससंदर्भात इशारा दिला होता. या पार्श्वभूमीवर हा बंदीचा निर्णय घेण्यात आला.

यानंतर काँग्रेसचे नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी पंतप्रधान मोदी आणि भाजपावर निशाणा साधलाय. चव्हाण यांच्या म्हणण्याप्रमाणे भारतीयांचा डेटा परदेशात पाठवणाऱ्या नमो अॅपवरही बंदी  घालण्यात यावी. यापूर्वी राहुल गांधी यांनीही नमो अ‍ॅपवरील डेटा कथित गैरवाराबद्दल शंका उपस्थित केल्या होत्या.

ट्रेंडिंग बातम्या-

अ‍ॅपल आणि गुगलचा TikTok ला दणका; घेतला ‘हा’ मोठा निर्णय

“या युद्धात शरद पवार यांनी एक काडी टाकली अन्…..”

महत्वाच्या बातम्या-

गोपीचंद पडळकरप्रकरणी उदयनराजेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले….

  सॅमसंगचा नवा स्मार्टफोन ; कॅमेराच्या ‘या’ नव्या फिचर्स सोबत बरंच काही….

धक्कादायक! 24 तासांत बीएसएफचे 53 जवान कोरोनाबाधित

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या