बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

टिक-टॉकवर बंदी, पण कंपनी करतेय सर्व भारतीय नियमांचं पालन; टिकटॉकचा भारतात कमबॅक होणार?

नवी दिल्ली | देशभरात केंद्र सरकारने टिकटॉक या मोबाईल अॅप्लिकेशनवर पूर्णपणे बंदी घातली होती. पण भारतात बंदी असलेल्या या अॅपने नवीन सोशल मीडिया कायदे आणि भारतीय मार्गदर्शक सूचनांचं पालन काटेकोरपणे केलं असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे भारतात टिक टाॅक परत येणार का? असा प्रश्न सध्या सर्वांनाच पडला आहे.

शॉर्ट व्हिडीओद्वारे अनेक लोक टिकटॉक या अॅप्लिकेशनवर प्रकाश झोतात आले व मोठे सेलिब्रिटी देखील बनले. भारतामध्ये परतण्यासाठी कंपनी यथोचित प्रयत्न करत असल्याचं दिसून येत आहे. त्यानुसारच केंद्र सरकारच्या नव्या नियमांचं पालन कंपनी काटेकोरपणे करत असल्याचं दिसून येत आहे.

दरम्यान, मंत्रालयातील काही अधिकाऱ्यांनी या संदर्भात बोलताना सांगितलं की, टिकटॉकवरील बंदी हा पूर्णतः हा वेगळा मुद्दा आहे आणि सोशल मीडिया नियम पाळणे वेगळा त्यामुळे टिक टाॅक हे अॅप भारतात पुन्हा एकदा सुरू होण्याची शक्यता अधिकाऱ्यांनी फेटाळून लावली.

टिक टॉक या कंपनीला भारतात पुन्हा एकदा परतण्यासाठी आशा आहे. तसेच त्यांनी केंद्र सरकारला यासंदर्भात पत्र पाठवून आम्ही सर्व नियमांचं पालन करू, असं वचन देखील दिलं आहे. परंतु, केंद्र सरकार यासंदर्भात सकारात्मक निर्णय घेईल, असं चित्र सध्या पाहायला मिळत नाही. त्यामुळे तूर्तास तरी टिक टाॅकवरील बंदी भारतात कायम राहणार असल्याचं दिसून येत आहे.

थोडक्यात बातम्या –

“काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना पक्षांचं सरकार येईल असा विचार माझ्याही मनात कधी आला नव्हता”

प्रत्येक महाविद्यालयात साजरा होणार शिवस्वराज्य दिन; मंत्री उदय सामंत यांची मोठी घोषणा

‘ही’ असू शकते भारतातील सर्वात स्वस्त लस, जाणून घ्या किंमत!

“संघाला कोरोनापेक्षा नरेंद्र मोदींच्या ढासळत्या लोकप्रियतेची चिंता”

टी-20 वर्ल्ड कपचं आयोजन करण्यासाठी ‘हा’ देश आला पुढे; बीसीसीआय पुढे नवं आव्हान

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More