भारतच आशियाचा चॅम्पियन; बांगलादेशला नागीन डान्स करण्याची संधीच दिली नाही

दुबई | अत्यंत रोमहर्षक ठरलेल्या आशिया चषकाच्या अंतिम लढतीत भारताने बांगलादेशचा पराभव केला आहे. या विजयामुळे भारताने सातव्यांदा आशिया चषकावर आपलं नाव कोरलं आहे. 

अंतिम सामन्यात प्रथम फलंदाजी करणाऱ्या बांगलादेशने भारतापुढे विजयासाठी 223 धावांचं आव्हान ठेवलं होतं. या आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी मैदानावर उतरलेल्या भारताला विजयासाठी संघर्ष करावा लागला. अखेरच्या चेंडूवर 3 गडी राखून भारताने विजय मिळवला. 

भारताकडून कर्णधार रोहित शर्मानं 48 धावा, महेंद्रसिंह धोनी 36 धावा आणि दिनेश कार्तिक 37 धावा यांनी विजयामध्ये महत्त्वाचं योगदान दिलं.

तत्पूर्वी, बांगलादेशकडून लिटन दास आणि मेहदी हसननं केलेली भागिदारी भारताला धडकी भरवणारी ठरली होती. त्यांनी 21 षटकांत 120 धावांची सलामी दिली.

महत्त्वाच्या बातम्या-

-धक्कादायक! पोलिओच्या लसीतच आढळले व्हायरस; महाराष्ट्रात हायअलर्ट

-तारिक भाई, इस बार आपने दिल तोड दिया- सुप्रिया सुळे

-भारतामुळे मला सलग 6 रात्री झोप लागली नाही; पाकिस्तानच्या कर्णधाराची कबुली

-शिवाजी महाराजांच्या खांद्यावर हात ठेवून भाजपच्या राज्यमंत्र्यांचं फोटोसेशन

-दानवे लक्षात ठेवा, धुळेकरांनी सुरेश जैनांंचं पार्सल पुन्हा पाठवंल होतं!

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

तुमच्या पसंतीच्या बातम्या