धर्माच्या पलीकडे जाऊन प्रत्येक महिन्याला मोफत रेशन वाटप

पुणे | बंधुभाव भाईचारा ट्रस्ट आणि नूर ए हिरा मस्जिद यांच्या वतीने प्रत्येक महिन्याच्या पहिल्या रविवारी गरजू कुटुंबांना मोफत रेशन वाटप करण्यात येते. मागील १ वर्षांपासून हा उपक्रम सुरु आहे. 

रविवारी २७० कुटुंबांनी रेशन वाटप करण्यात आलं, यामध्ये १७ अपंग व्यक्तींचाही समावेश होता. मार्केट यार्ड जवळील गंगाधाम चौकात हा कार्यक्रम पार पडला.

दरम्यान, जो गरजू येतो त्याला धर्म न पाहता माणुसकीच्या नात्याने रेशन दिलं जातं, अशी माहिती बंधुभाव भाईचारा ट्रस्टचे अध्यक्ष शाबीर शेख यांनी दिली.

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

तुमच्या पसंतीच्या बातम्या