Mumbai l मुंबईकरांसाठी एक आनंदाची बातमी आहे. मुंबईतील शहरातील एक महत्त्वाचा मेट्रो मार्ग अवघ्या काही दिवसांमध्ये मुंबईकरांच्या सेवेत दाखल होणार आहे. कारण कुलाबा-वांद्रे-सीप्झ मेट्रो मार्गिकेच्या दुसऱ्या टप्प्याचे 92 टक्के काम अद्याप पूर्ण झाले आहे. त्यामुळे आता मुंबईकरांना एक महत्त्वाचा मेट्रो मार्ग मिळणार आहे.
मुंबईकरांना मेट्रो मार्ग मिळणार! :
मिळालेल्या माहितीनुसार, कुलाब्यापर्यंत काम पूर्ण होण्यासाठी जून महिना लागला आहे, त्यामुळे मार्च महिन्यापर्यंत वरळीपर्यंतची मार्गिका खुली करण्याचे नियोजन सध्या करण्यात आले आहे. याशिवाय यासंदर्भात उपमुख्यमंत्री आणि नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी 100 दिवसांच्या आत वांद्रे-कुर्ला संकुल ते वरळीपर्यंतची वाहतूक सुरू करण्याचे निर्देश त्यांनी दिले आहेत.
याशिवाय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील नुकताच मेट्रो मार्गिकांच्या कामाचा आढावा देखील घेतला आहे. तसेच यानुसार यावर्षी किमान 50 किमीची मेट्रो मार्गिका देखील सुरू करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. तसेच 50 किमीपैकी 21 किमी भुयारी मेट्रो असणार आहे.
Mumbai l महानगर प्रदेशातील प्रवास काही मिनिटांवर येणार :
दरम्यान, कुलाब्यापर्यंत मेट्रो सुरू होण्यास पुढील काही महिने जाणार आहेत. तसेच वरळीपर्यंतच्या मार्गिकेवर वाहतूक सुरू करण्याचे नियोजन देखील लवकरच करण्यात येत आहे. तसेच आता यादृष्टीने वांद्रे-कुर्ला संकुल ते वरळीपर्यंतच्या कामांना देखील वेग आला आहे.
तसेच मुंबई महानगर प्रदेशात तब्बल 337 किमी मेट्रो मार्गिकांची कामे सुरू आहेत. याशिवाय या सर्व मार्गिका कार्यान्वित झाल्यानंतर संपूर्ण महानगर प्रदेशातील प्रवास काही मिनिटांवर येणार असल्याच म्हंटल आहे. तसेच यादृष्टीने भुयारी मार्गाच्या दुसऱ्या टप्प्याचे काम देखील 92 टक्के पूर्ण करण्यात आले आहे.
News Title : Bandra Kurla to Worli Metro to start in March?
महत्वाच्या बातम्या –
देशभरातील HMPV च्या रुग्णांचा आकडा समोर!
नवी मुंबईतल्या सिडकोच्या घरांच्या किंमती जाहीर!
HMPV ने चिंता वाढवली, राज्यात ‘या’ ठिकाणी 6 महिन्याचं बाळ पॉझिटीव्ह
मोठी बातमी! अंडरवर्ल्ड डॉन अरुण गवळी तुरुंगातून बाहेर येणार
पुण्याला मिळणार 4 वंदे भारत एक्सप्रेस; ‘या’ मार्गांवर धावणार