बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

कोरोना ही बिल गेट्सची कल्पना, तो व्हायरस नसून दहशत- बंडातात्या कराडकर

कराड | देशासह राज्यात कोरोना रूग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. तसेच राज्यातील कोरोनाची परिस्थिती चिंताजनक झालीये. कुठे लोकांना उपचारासाठी बेड मिळत नाहीये तर काहींना स्मशानात अंत्यसंस्कार करण्यातसाठी जागा. अशात ह. भ. प. बंडातात्या कराडकर यांनी कोरोनाबाबत अजब वक्तव्य केलं आहे.

कोरोनाची कल्पना बिल गेट्सच्या डोक्यातून निर्माण झाली असून भारतासह अनेक देश बिल गेट्सची खेळणी आहेत. जगातील अनेक तज्ञ ओरडून सांगत आहेत. तरीही लोकांच्या डोळ्यात धूळ फेकण्याचं कामं चालू आहे. त्यामुळे कोरोना हा वायरस नसून दहशत आहे, असं ह. भ. प. बंडातात्या कराडकर यांनी म्हटलं आहे.

कोरोनाला नागरिकांनी घाबरून जाऊ नये. कोरोनाची लक्षणे ताप, थंडी, सर्दी, कफ, खोकला असे सामान्य लक्षणे असून तो जीवघेणा रोग नाही. यावर आयुर्वेदात शेकडो उपाय आहेत. पण सरकार हे उपाय यांना प्राधान्य देत नाही. कारण ही औषधे बिल गेट्सची नाहीत, असं बंडातात्या कराडकर म्हणालेत.

दरम्यान, बंडातात्या कराडकर यांनी या संदर्भात एक प्रसिद्धी पत्रक जाहीर केलं आहे. माझं हे वैयक्तिक परखड मत असून यास कुठलाही सांप्रदाय आणि संघटना जबाबदार नाही, असंही बंडातात्या कराडकर यांनी स्पष्ट केलं आहे.

थोडक्यात बातम्या- 

मराठी चित्रपट चालत नाहीत याला मराठी प्रेक्षकच जबाबदार; प्रसाद ओक संतापला

कोरोना झाला, दिवसभर फिरुनही बेड मिळाला नाही; पुण्यातील महिलेची आत्महत्या

करण जोहरनं कार्तिक आर्यनला सिनेमातून काढलं, यापुढेही काम देणार नाही?

पत्नीचं दुसऱ्याशी अफेअर, पती ढसाढसा रडला अन् उचललं धक्कादायक पाऊल

कोरोना काळात ‘गरिबांचा मसीहा’ बनलेल्या सोनू सूदलाही कोरोनाची लागण

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More