गोव्यात गोमांस बंदी करा, मनोहर पर्रिकरांच्या प्रकृतीत सुधारणा होईल!

पणजी | गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्या प्रकृतीत सुधारणा व्हावी यासाठी गोव्यात तातडीने गोमांस बंदी करा, असा अजब सल्ला अखिल भारतीय हिंदू महासभेचे स्वामी चक्रपाणी महाराज यांनी दिला आहे. 

मनोहर पर्रिकर हे काही दिवसांपासून अजारी आहेत. त्यांच्यावर सध्या उपचार सुरु आहेत.

पर्रिकरांच्या प्रकृतीत सुधारणा होत नसल्यानं गोव्यात नेतृत्त्व बदल गरजेचा आहे, असं केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक यांनी म्हटलं होतं. त्यावर गोव्यात गोमांसबंदी केल्यावर पर्रिकरांच्या प्रकृतीत सुधारणा होईल, असा दावा चक्रपाणी यांनी केला आहे. 

दरम्यान, चक्रपाणी यांनी केलेला दावा पर्रीकरांच्या विचारसरणीशी जुळत नाही. कारण याआधी पर्रिकरांनी गोमांस व्यापाऱ्यांचं समर्थन केले आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

-नाव बदललं, आता संपूर्ण अयोध्येत मांस-मटण आणि दारूवर बंदी आणण्याची तयारी

-स्टार क्रिकेटपटू मिताली राजनं दिले क्रिकेटमधून निवृत्त होण्याचे संकेत…

-राम जन्मभूमी खटल्याची सुनावणी लवकर घेण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार

-राज ठाकरेंनी उत्तर भारतीयांची माफी मागावी; संजय निरुपम यांची मागणी

-…म्हणून मुख्यमंत्र्यांच्या बैठकीतून तडकाफडकी बाहेर पडले धनंजय मुंडे