Pune | बाणेर, बालेवाडी, पाषाण, सूस, म्हाळुंगे आदी भागातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर होता. बाणेर, बालेवाडी हा कोथरूडचा भाग झपाट्याने विकसित होत असल्यामुळे हा भाग पुरेसे पाणी उपलब्ध व्हावं या प्रतिक्षेत होता. या विभागास टाकी मंजूर करण्यात आली, पण काम रखडलं होतं. हा प्रश्न सोडवण्यासाठी कोथरूडचे आमदार चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी पुढाकर घेत हा प्रश्न मार्गी लावल्याने नागरिकांना मोठा दिलासा मिळालाय.
बाणेर-बालेवाडीचा पाणी प्रश्न अखेर मिटला
महापालिकेला हा प्रश्न सोडविण्यास विलंब होत असेल तर लोकसहभागातून पाणी प्रश्न सोडविला जाईल, असं आश्वासन चंद्रकांत पाटील यांनी दिलं होतं. महापालिकेने आवश्यक परवानगी आणि पायााभूत सुविधा निर्माण करून द्याव्यात, असंही चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी सांगितलेलं.
चंद्रकांत पाटलांनी (Chandrakant Patil) या प्रकरणी लक्ष घातल्याने कामाला गती मिळाली. टाकीचे काम पूर्ण झाले आणि 18 कोटी लिटर पाणी मिळू लागल्याने बाणेर, बालेवाडी भागात मुबलक पाणी मिळू लागलं आहे.
वाढत्या लोकसंख्येला सामावून घेण्यासाठी शहरात उंचच उंच इमारती उभ्या राहतात. पण या इमारतीत राहणाऱ्यांना हळू-हळू कमी पडू लागतं जीवन, म्हणजेच पाणी. पुण्यातही अनेक ठिकाणी तसेच झाले. रोजगाराच्या संधींमुळे महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून लोक पुण्यात येऊ लागले, स्थिरावू लागले. पण पाणी तितकेच राहिले. आणि वाढत्या उपनगरांमध्ये पाण्याची समस्या निर्माण झाली.
अन्य उपनगरांप्रमाणे कोथरूड मतदारसंघातील बाणेर, बालेवाडी हा भागही झपाट्याने विकसित झाला. पण या भागातही समस्या सतावू लागली, मुबलक पाण्याची. वाढत्या वस्तीमुळे या भागातील पाण्याचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होऊ लागला होता. रहिवासी त्रस्त झाले होते. महानगरपालिकेच्या 24 तास पाणीपुरवठा योजनेच्या अंतर्गत या भागासाठी टाकी मंजूर झाली होती, पण काम पुढे सरकत नव्हते. त्यामुळेच बाणेर बालेवाडी भागातील रहिवासी आणखी अडचणीत आले होते.
चंद्रकांत पाटलांच्या प्रयत्नांना यश
हा विषय चंद्रकांतदादा पाटील (Chandrakant Patil) यांच्या निदर्शनास येताच त्यांनी या कामाला गती दिली. त्यांनी 18 कोटी लिटर पाणी बाणेरसाठी उपलब्ध करून दिले. 2023 च्या मे महिन्यात पाण्याच्या टाकीचे काम पूर्ण झालं. यामुळे बाणेर बालेवाडी भागातील नागरिकांना दिलासा मिळालाय.
महत्त्वाच्या बातम्या-
“आम्ही धर्मयुद्ध लढत बसू अन् तिकडे अमृता फडणवीस रील बनवत..”; ‘या’ नेत्याचा टोला
ऐन निवडणुकीत दुःखद बातमी, भाजपच्या ‘या’ माजी खासदाराचं निधन
“तुम्ही ज्यावर प्रेम केलं, तो सूरज आता तसा नाही…”; कोकण हार्टेड गर्लने वादावर मौन सोडलं
मोठी बातमी! नितीन राऊत यांच्या कारचा भीषण अपघात, प्रचारावरून परततानाच..
“सर्वांनी मिळून माझा लोकसभेत पराभव केला”; नवनीत राणांचं महायुतीलाच आव्हान