बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

बंगळुरुचा विजयी चौकार, राजस्थानवर 10 विकेट्सने मिळवला विजय

मुंबई | आयपीएल हंगामातील 16वा सामना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि राजस्थान रॉयल्समधील सामन्यात बंगळुरुने आपला सलग चौथा विजय मिळवला आहे. राजस्थानच्या  178 धावांचा पाठलगा करताना कर्णधार विराट कोहली आणि देवदत्त पडीक्कलच्या भागीदारीने सहज विजय मिळवला आहे. या विजयाने कोहलीच्या संघाने गुणतालिकेत पुन्हा एक नंबर मिळवला आहे.

देवदत्त पडीक्कल आणि विराट कोहली या सलामी जोडीने आपली विकेट न गमावत 10 गड्यांनी राजस्थानचा पराभव केला आहे.देवदत्तनं 52 चेंडूत 101 धावा केल्या. तर विराटने 47 चेंडूत 72 धावा केल्या. राजस्थानच्या गोलंदाजांना दोघांच्या जोडी फोडण्यात अपयश आलं. बंगळुरूने मुंबईला, दुसऱ्या सामन्यात हैदराबादला आणि तिसऱ्या सामन्यात कोलकाताला पराभूत केलं आहे.

राजस्थानची सुरूवात एकदम खराब झाली. सलामीवर बटरल आणि वोहरा पुन्हा एकदा अपयशी ठरले तर कर्णधार संजू आजही दमदार खेळी करण्याच अपयशी ठरला. मात्र त्यानंतर शिवम दुबे आणि रियान परागने चांगली भागीदारी बनवली होती. मात्र अंतिम पाच षटकांच्या अगोदर दोघे बाद झाले.

दरम्यान, त्यानंतर आलेल्या राहुलव तेवतियाने आपले तेवर दाखवत 40 धावांची स्फोटक फलंदाजी केली. राजस्थानने बेंगलोरला 178 धावांचं लक्ष्य दिलं आहे. बेंगलोरतर्फे र्हषल पटेलने आणि सिराजने सर्वाधिक 3 बळी घेतले तर जमिसन, रिचर्डसन आणि सुंदरने एक बळी घेतला.

थोडक्यात बातम्या- 

धक्कादायक! बेड मिळाला नाही म्हणून झाडाखाली झोपले अन् पत्नीसमोर सोडला प्राण

आजपासून सुरू झालेल्या लॉकडाऊनची संपूर्ण नियमावली; वाचा एका क्लिकवर…

आरे भावा तुच जिंकलाय टॉस! टॉसदरम्यान गोंधळला विराट कोहली, पाहा व्हिडीओ

चिंता वाढली… महाराष्ट्रात नव्या कोरोनाबाधितांमध्ये विक्रमी वाढ!

मोठी बातमी! ‘या’ राज्यातील प्रत्येक व्यक्तिला मोफत लस मिळणार, मुख्यमंत्र्यांनी केली घोषणा

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More