बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

#IPL2021 अटीतटीच्या सामन्यात हैदराबादचा बंगळुरूवर ‘रॉयल’ विजय

मुंबई | आयपीएल 14 व्या सीझनचा आजचा 52 वा सामना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि सनरायझर्स हैदराबाद या दोन्ही संघात झाला. बंगळुरू संघाने प्रथम नाणेफेक जिंकत हैदराबादला फलंदाजी करण्यासाठी आमंत्रण दिलं होतं. बंगळुरू संघाच्या गोलंदाजांनी घातक गोलंदाजी करत हैदराबाद संघाला 141 धावा रोखलं. अटीतटीच्या सामन्यात हैद्राबादचा बंगळुरुवर रॉयल विजय झाला. शेवटच्या षटकात 13 धावांची बंगळुरू संघाला गरज असताना भुवनेश्वर कुमारने घातक गोलंदाजी केली आणि हा सामना हैदराबादने 4 धावांनी खिशात टाकला.

बंगळुरु संघाचा गोलंदाज हर्षल पटेलने आयपीएलमध्ये इतिहास रचत जसप्रित बुमराहचा  आयपीएलमधील एका पर्वातील 27 बळीचा विक्रम मोडीत काढला आहे. या सामन्यात त्याने 3 बळी घेत त्याने आयपीएल मध्ये 29 बळी घेतलं आहे. हर्षल पटेलच्या आणि डानियल ख्रिचन या गोलंदाजीसमोर हैदराबादचे फलंदाज झटपट बाद झाले.

हैदराबादचा सलामीवीर फलंदाज जेसन रॉयने जबरदस्त खेळी करत 44 धावा काढल्या. त्यामुळेच हैदराबादला 141 धावांपर्यंत मजल मारता आली. त्यानंतर बंगळुरू संघाच्या ग्लेन मॅक्सवेलने 25 चेंडूत 40 धावांची दमदार खेळी साकारली. तर देवदत्त पडिक्कलने संथ खेळी करत 52 चेंडूंत 41 धावा काढल्या.

दरम्यान, आयपीएलमधील 14 व्या हंगामातील आता शेवटचे सामने खेळविले जात आहे. 15 ऑक्टोंबरला आयपीएलचा अंतिम सामना होणार आहे. आतापर्यंत आयपीएलच्या 14 व्या सीझनमध्ये दिल्ली कॅपिटल्स ,चेन्नई सुपरकिंग्ज आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू या संघाने दिमाखात बादफेरीत प्रवेश केला आहे.

थोडक्यात बातम्या-

पुणे कोरोना अपडेट; जाणून घ्या आजची आकडेवारी एका क्लिकवर

‘राजकारण्यांनी तुमच्या हातात बंदुका दिल्या, हिंमत असेल तर…’; ‘त्या’ मुलीचं दहशतवाद्यांना खुलं आव्हान

“तुम्ही शेतकऱ्यांच्या अंगावर गाड्या घातल्या, आता शेतकरी तुमच्या पक्षावर नांगर फिरवतील”

पंजाबच्या मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा! ‘त्या’ शेतकरी कुटुंबांना मिळणार 50 लाखांची मदत

हर्षल पटेलने रचला इतिहास! जसप्रीत बुमराहचा ‘तो’ रेकाॅर्ड मोडला

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More