बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

यॉर्कर राज सिराज! अटीतटीच्या सामन्यात बंगळुरूचा अवघ्या एका धावेने विजय

मुंबई | रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि दिल्ली कॅपिटल्सवरमधील सामन्यात बंगळुरूने 1 धावेने विजय मिळवला आहे. आरसीबीचा गोलंदाज मोहम्मद सिराजने अखेरच्या षटाकत 14 धावांची गरज असताना केलेल्या यॉर्करच्या अचूक माऱ्यामुळे बंगळुरूला विजय मिळवणं शक्य झालं.  बंगळुरूच्या 172 धावांचा पाठलाग करताना दिल्लीला  170 धावांवर रोखण्यात आरसीबीला यश आलं.

आरसीबीची सुरूवात निराशजनक झाली. 4 षटकात आरसीबीने 30 धावांवर दोन्ही सलामीवीरांच्या विकेट्स गमावल्या होत्या. परंतु त्यानंतर ग्लेन मॅक्सवेल, रजत पाटीदार, एबी डिव्हिलियर्सने बँगलोरचा डाव सावरला. डिव्हिलियर्सच्या 75 धावांच्या खेळीच्या जोरावर बँगलोरने दिल्लीसमोर 171 धावांचा डोंगर उभा केला आहे.

दिल्लीकडून शिमरन हेटमायरने धडाकेबाज खेळी करत अवघ्या 25 चेंडूत 53 धावांची खेळी करत या सामन्यातील दिल्लीचं आव्हान शेवटच्या चेंडूपर्यंत जिवंत ठेवलं होतं. सोबत कर्णधार ऋषभ पंतने 58 धावांची संयमी खेळी केली. तर बँगलोरकडून हर्षल पटेलने सर्वाधिक 2 विकेट्स घेतल्या. त्याला मोहम्मद सिराज आणि काईल जेमिसनने प्रत्येकी 1 विकेट घेत चांगली साथ दिली.

दरम्यान, दिल्लीच्या ऋषभ पंत आणि शिमरोन हेटमायरने प्रयत्नांची पराकाष्ठा केली, पण त्यांना अपयश आले. शेवटच्या षटकात दिल्लीला विजयासाठी 14 धावांची गरज असताना मोहम्मद सिराजने 12 धावा दिल्या. आरसीबीने या विजयासह गुणतालिकेत अव्वल स्थान पटकावलं आहे.

थोडक्यात बातम्या- 

भारत बायटेकने जाहीर केली लसीची किंमत; सीरमची लस स्वस्त की भारत बायटेकची?, जाणून घ्या 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या काकूंचं कोरोनामुळे निधन

“मेच्या ‘या’ तारखेपर्यंत महाराष्ट्राला लस पुरवता येणार नाही, मोदी सरकारनं स्टॉक बुक केला आहे”

मुंबईतील कोरोना बळींचा आकडा लपवला जातोय- देवेंद्र फडणवीस

“सगळी इंजेक्शन आधीच वाटली आहेत, आता रिकामी खोकी घेऊन जाऊ शकता”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More