चालू सामन्यात घेतली पंचांची परवानगी, केली प्रेक्षकाची धुलाई!

ढाका | बांगलादेशी क्रिकेटपटू शब्बीर रेहमाननं चालू मॅचमध्ये पंचांची संमती घेतली आणि मैदानाबाहेर जाऊन हुर्ये करणाऱ्या प्रेक्षकाची धुलाई केली. हा प्रकार त्याच्या चांगलाच अंगलट येण्याची शक्यता आहे. 

राजशाही डिविजन नॅशनल क्रिकेट लीगच्या दुसऱ्या दिवशी हा प्रकार घडला. याप्रकरणी शब्बीरच्या चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. 

शब्बीर दोषी आढळला तर त्याच्यावर अनेक सामन्यांसाठी बंदी येऊ शकते तसेच 5 लाख रुपयांपर्यंत दंडाची शिक्षा देखील होऊ शकते, असं शिस्तपालन समितीचे उपाध्यक्ष शेख सोहेल यांनी सांगितलंय.