Top News क्राईम महाराष्ट्र वाशिम

“आराेप सिद्ध हाेईपर्यंत संजय राठाेड यांच्यावर कारवाई नको”

Photo Credit- Facebook/ Udhhav Thackarey, Sanjay Rathod

वाशिम | पूजा चव्हाण प्रकरणात चांगलेच अडचणीत आलेले महाराष्ट्र राज्याचे वनमंत्री संजय राठोड हे बंजारा समाजाचे प्रतिनिधित्व करतात. बंजारा समाजाचे महंत यांनी संजय राठोड यांच्यावर आरोप सिद्ध होईपर्यंत कोणत्याही प्रकारची कारवाई करण्यात येऊ नये, अशी मागणी थेट मुख्यमंत्र्याकडे करण्याचा निर्णय घेतला आहे.

बंजारा समाजाच्या महतांची पोहरादेवी येथे एक बैठक पार पडली ज्या दरम्यान या विषयावर चर्चा झाल्याचं समजतंय. पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात आम्ही बंजारा समाजातर्फे मुख्यमंत्र्यांना निवेदन पाठवणार असल्याचं सेवालाल ट्रस्टचे अध्यक्ष महंत कबीरदास महाराजांनी सांगितलं आहे.

पोहरादेवी विकासकामांसह पूजा आत्महत्या प्रकरणावरही महंतांची चर्चा झाली, यावेळी ते बोलत होते. यावरून बंजारा समाज अजूनही संजय राठोड यांच्या पाठीशी असल्याचं दिसून येत आहे. यावर आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे काय निर्णय घेणार?  हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

सुरुवातीला पोलिसांनी हा आकस्मिक मृत्यू असल्याची नोंद केली होती त्यानंतर सुरू असलेल्या तपासावरून हा खरंच आकस्मिक मृत्यू आहे का? असा प्रश्न उपस्थित होत आहे. अरुण राठोडला झालेल्या अटकेनंतर आता आणखी या प्रकरणाला कोणतं वळण मिळणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

थोडक्यात बातम्या-

राज्य सहकारी बँक घोटाळा प्रकरणी अजित पवार यांना दिलासा!

होम क्‍वारंटाइन रुग्णांच्या हातावर पुन्हा शिक्का, घराबाहेर पडल्यास होणार ‘ही’ कारवाई

“काँग्रेसनं संविधान सांभाळलं म्हणून चहावाला देशाचा पंतप्रधान झाला”

हे आघाडीचं सरकार, काँग्रेसचं सरकार आल्यावर वीजेचं बिल माफ करणार- नाना पटोले

राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांना कोरोनाची लागण!

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या