बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

पुढील दोन दिवस बँका राहणार बंद; जाणून घ्या कारण!

मुंबई | देशाच्या अर्थमंत्री निर्मला सितारमण यांनी अर्थसंकल्प सादर करताना ‘बॅड बँक’ असा उल्लेख केला होता. त्यानंतर या बॅड बँकांचे खाजगीकरण करण्यात येईल असं सांगितलं होतं. त्यानंतर कोणत्या बँका खाजगी होतील यावर सगळ्यांचं लक्ष लागले आहे. या खाजगीकरणाला बँकेतील कर्मचारी वर्ग आणि अधिकाऱ्यांनी विरोध केला आहे.

मागील शनिवार आणि रविवारी बँका बंद होत्या. त्यानंतर आता पुढील दोन दिवस म्हणजेच सोमवारी आणि मंगळवारी बँकेचे कर्मचारी आणि अधिकारी संपावर जाणार आहेत. त्यामुळं बँकेच्या कामकाजाचा फटका सामान्यांना फटका बसणार आहे. यामध्ये राज्यातील 50 हजार कर्मचारी संपावर जाणार आहेत. तर देशातील 10 लाख कर्मचारी यात सहभागी असतील.

आयडीबीआय आणि आणखी दोन बँकांच्या खाजगीकरणास या कर्मचारी संघटनेचा विरोध आहे. या संपात 9 संघटना सहभागी होणार आहे. युएफबीयुनं म्हणजेच युनायटेड फोरम ऑफ बँक युनियनने हा संप पुकारला आहे. यामध्ये सार्वजनिक बँका, खाजगी बँका, तसेच ग्रामीण बँका देखील सहभागी असतील.

दरम्यान, सार्वजनिक बँकेचा वाढता एनपीए सरकारसाठी डोकेदुखीचा प्रश्न बनला आहे. त्यामुळे बँकेचे खाजगीकरण करण्याचा प्रयत्न केंद्र सरकार वारंवार करत आहे. त्यामुळं बँक कर्मचाऱ्यांच्या नोकरीवर गदा येण्याची शक्यता आहे. याबाबत सरकारकडून कोणतही धोरण समोर आलं नाही. त्यामुळं कर्मचारी आणि अधिकाऱ्यांमध्ये नाराजीचं वातावरण आहे.

थोडक्यात बातम्या- 

या’ भाजप खासदाराच्या सुनेनं कापली हाताची नस, केले ‘हे’ धक्कादायक आरोप

बिजली मल्ल म्हणून प्रसिद्ध असलेले माजी आमदार संभाजी पवार काळाच्या पडद्याआड

काय सांगता! भर सोहळ्यात अभिनेत्रीनं काढले रक्ताळलेले कपडे अन्….

सचिन वाझेंना अटक करुन महाराष्ट्र पोलीस दलाचा अपमान केला- संजय राऊत

‘हा’ आयपीओ बाजारात बुधवारी धडकणार; गुंणतवणुकदांरांंना मोठी संधी

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More