खुशखबर! कोट्यवधी तरुणांना बँकेत मिळणार नोकरी, जाणून घ्या सविस्तर

Bank Jobs 2024 | देशभरातील कोट्यवधी तरुणांना आता थेट बँकेत नोकरी करण्याची संधी मिळणार आहे. देशातील बँका पदवीधरांना नोकऱ्या देणार आहे. ही नोकरी अप्रेंटिसच्या स्वरुपात असणार आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या अर्थसंकल्पीय घोषणेनंतर हे महत्वाचं पाऊल उचलण्यात आलं आहे.  (Bank Jobs 2024 )

आगामी पाच वर्षांत एक कोटी तरुणांना शीर्ष 500 कंपन्यांमध्ये प्रशिक्षण (इंटर्नशिप) देण्याचे सरकारचे लक्ष्य आहे. यामुळे देशातील कोट्यवधी पदवीधर तरुणांना नोकरी मिळणार आहे. विशिष्ट कौशल्यांचे प्रशिक्षण घेतलेल्या अशा इंटर्न्सना बँका दरमहा 5000 रुपये मानधन देण्याची शक्यता आहे.

बँकेत पुढील एक महिन्यात 21 ते 25 वर्षे वयोगटातील तरुणांना नोकरी मिळण्याचा मार्ग मोकळा होत आहे. तरुणांना बँकिंग कामाचे प्रशिक्षण पण देण्यात येईल. मिळालेल्या माहितीनुसार, बँक एका महिन्यात 25 वर्षांखालील पदवीधरांना नोकऱ्या देणार आहे. शिकाऊ उमेदवार म्हणून ही नोकरी असणार आहे.

पात्रता काय असणार?

विपणन, वसुलीसह बँकेतील इतर कामांसाठी पात्र तरुण उमेदवार बँकांना मदत करतील. या कामासाठीचे प्रशिक्षण पण देण्यात येईल. यामुळे पुढील पाच वर्षांत बँकांना मोठे कुशल मनुष्यबळ उपलब्ध होईल. कायस्वरुपी भरती प्रक्रियेत या कुशल मनुष्यबळाला प्राधान्य मिळेल. या पदासाठी उमेदवाराचे वय हे 21-25 वर्ष दरम्यान असावे. तो पदवीधर असावा. तो करदाता नसावा. तसेच त्याच्याकडे IIT किंवा IIM सारख्या सर्वोच्च संस्थांमधून पदवी नसावी. (Bank Jobs 2024 )

नोकरीचा कालावधी किती असणार?

पदवीधर असलेल्या तरुणांना किमान 12 महिन्यांपर्यंत कामावर ठेवता येईल. म्हणजे वर्षाला कमीत कमी 60 हजार रुपये ते कमावतील. त्यांना लास्ट माईल बँकिंग सेवा घेण्यासाठी व्यवसाय प्रतिनिधींसारख्या इतर क्षेत्रात देखील नियुक्त केले जाईल. यामुळे पात्र उमेदवारांना भविष्यातील कायमस्वरुपी नोकरीसाठी त्याचा फायदा होईल. (Bank Jobs 2024 )

News Title :  Bank Jobs 2024

महत्वाच्या बातम्या-

बाप्पाच्या प्रतिष्ठापनेचा शुभ मुहूर्त कोणता?, जाणून घ्या पूजेला लागणारे साहित्य व मंत्र

आज ‘या’ 4 राशींवर राहील बाप्पाची कृपा, सर्व मनोकामना होतील पूर्ण

विनेश फोगाट राजकीय मैदान गाजवणार, कॉँग्रेसमध्ये प्रवेश करताच मिळालं विधानसभेचं तिकीट

गणपती बाप्पाच्या आगमनाने संकटे होतील दूर, ‘या’ राशींचे येणार सुवर्णदिवस

“… म्हणून आम्ही सारखे दिल्लीत जातो”, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा मोठा खुलासा