पुणे | बॅंक ऑफ बडोदाच्या एटीएममध्ये पहिल्या क्रमांकावर चक्क गुजराती भाषेला स्थान देण्यात आलं आहे. धक्कादायक बाब म्हणजे भाषांच्या पर्यायात मराठीचा समावेश नसल्याचं स्पष्ट दिसतंय.
शरद बोदगे यांनी यासंदर्भात ट्विट केलं आहे. पुण्याच्या कर्वेनगर येथील काकडे प्लाझामधील एटीएममध्ये पैसे काढण्यासाठी गेले असता त्यांच्या ही बाब लक्षात आली. त्यानंतर त्यांनी ट्विट करुन बॅंकेकडे तक्रार केली.
महाराष्ट्रातील एटीएमवर गुजराती भाषा दाखवण्याचा काय संबंध? प्राधान्याने आम्हाला येथे १. मराठी, २. इंग्रजी आणि असेल तर हिंदी भाषा हव्या आहेत, असं त्यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे. त्यावर आपल्या तक्रारीची दखल घेण्यात आली आहे, असं उत्तर बॅंकेकडून देण्यात आलं आहे.
मराठी ही महाराष्ट्राची राजभाषा आहे तसेच राज्यात बहुसंख्य मराठी लोक राहतात. असं असतानाही बहुतांश बॅंकांच्या एटीएममध्ये मराठीला स्थान न देता इतर भाषांना स्थान दिल्याचं दिसतं. या प्रकरणी राज्य सरकारने गंभीर पावलं उचलण्याची मागणी होत आहे.
.@bankofbaroda महाराष्ट्र राज्यातील एटीएम मशीनवर #गुजराती भाषा दाखविण्याचा काय संबंध??? प्राधान्याने आम्हाला येथे १. #मराठी २. #इंग्रजी आणि ३. असेल तर #हिंदी या भाषा हव्या आहेत. #म @BankofBarodaCEO pic.twitter.com/blFMXgYAuH
— Sharad Bodage (@SharadBodage) February 15, 2020
ट्रेडिंग बातम्या-
“राज्यात 8 हजार पोलिसांच्या आणि 7 हजार सिक्युरिटी गार्डच्या जागा भरणार”
“मुलींनी प्रेम करु नये हे समाजाने का ठरवावे?, त्यांच्या भावनांचं काय होणार?”
महत्वाच्या बातम्या-
मला राजकारणात यायचं नव्हतं पण…- पूनम महाजन
शेतकऱ्यांनी वीज बीलं भरु नये- रघुनाथ पाटील
भाजप नेत्याने पुष्पहार घातला म्हणून डॉ. आंबेडकरांच्या पुतळ्याचं गंगाजलाने शुद्धीकरण!
Comments are closed.