Bank Of Baroda Recruitment 2025 l बँकिंग क्षेत्रात नोकरी करू इच्छिणाऱ्या तरुणांसाठी बँक ऑफ बडोदा (BOB) मध्ये अप्रेंटिसशिप ट्रेनिंगसाठी मोठी भरती सुरू झाली आहे. एकूण 4000 पदांसाठी अर्ज प्रक्रिया सुरू झाली असून, इच्छुक उमेदवार 11 मार्च 2025 पर्यंत अर्ज करू शकतात.
भरती प्रक्रियेविषयी महत्त्वाची माहिती :
विभागाचे नाव: बँक ऑफ बडोदा (BOB)
पदाचे नाव : अप्रेंटिसशिप ट्रेनिंग
पदसंख्या: 4000
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 11 मार्च 2025
अर्ज करण्यासाठी अधिकृत वेबसाइट: bankofbaroda.in
वयोमर्यादा आणि पात्रता :
किमान वय: 20 वर्षे
कमाल वय: 28 वर्षे
आरक्षित प्रवर्गातील उमेदवारांसाठी शासन नियमानुसार वयात सवलत दिली जाईल.
Bank Of Baroda Recruitment 2025 l शैक्षणिक पात्रता:
उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापीठ किंवा संस्थेतून पदवीधर (Graduate) असणे आवश्यक आहे.
अर्ज फी :
सामान्य (UR), EWS, OBC ₹800
SC, ST, महिला उमेदवार ₹600
PWBD (अपंग उमेदवार) ₹400
बँक ऑफ बडोदा भरती 2025 अंतर्गत उमेदवारांची निवड तिन्ही टप्प्यांतून केली जाणार आहे:
– ऑनलाइन परीक्षा
– कागदपत्रांची पडताळणी
– राज्य-विशिष्ट भाषा प्राविण्य चाचणी
बँकिंग क्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्या तरुणांसाठी बँक ऑफ बडोदा अप्रेंटिसशिप ट्रेनिंग भरती 2025 ही उत्तम संधी आहे. 4000 रिक्त पदांसाठी अर्ज प्रक्रिया सुरू असून, इच्छुक उमेदवारांनी 11 मार्चपूर्वी अर्ज करावा.