मार्चच्या शेवटच्या आठवड्यात 4 दिवस बँका बंद राहणार? काय आहे यामागचं कारण?

Bank Holiday List

Bank Strike News l मार्च महिन्याच्या अखेरीस आर्थिक वर्ष संपत असल्यामुळे बँकांमध्ये मोठ्या प्रमाणावर आर्थिक व्यवहार होतात. मात्र, 24 आणि 25 मार्च रोजी देशभरातील अनेक बँका बंद राहण्याची शक्यता आहे. महिन्याच्या चौथ्या आठवड्यात 22 मार्चला शनिवार आणि 23 मार्चला रविवार असल्यामुळे बँकांना आधीच सुट्टी आहे. त्यामुळे सोमवार आणि मंगळवारी बँका बंद राहिल्यास, ग्राहकांच्या आर्थिक व्यवहारांवर मोठा परिणाम होऊ शकतो.

बँका का बंद राहणार? :

सार्वजनिक सुट्टी किंवा आठवड्याचा शेवट नसतानाही 24 आणि 25 मार्च रोजी बँका बंद राहण्याचे मुख्य कारण म्हणजे बँक कर्मचाऱ्यांचा देशव्यापी संप. इंडियन बँक्स असोसिएशन (IBA) सोबतच्या चर्चेत कोणताही सकारात्मक तोडगा निघालेला नाही. त्यामुळे विविध मागण्यांसाठी बँक कर्मचारी संघटनांनी संप पुकारला आहे.

संपामागील प्रमुख कारणे:

– बँकांमध्ये रिक्त पदांवर त्वरित भरती करणे.
– सातत्याने पाच दिवसांचा कार्यालयीन आठवडा लागू करणे.
– ग्रॅच्युइटीच्या मर्यादेत वाढ करून ती २५ लाखांपर्यंत करणे.
– आयकरमुक्त ग्रॅच्युइटी देण्याची मागणी.
– केंद्र सरकारच्या आर्थिक सेवा विभागाने कर्मचाऱ्यांच्या कामगिरीनुसार इन्सेन्टीव्ह देण्याच्या योजनेला विरोध.

Bank Strike News l ग्राहकांना होणारा फटका :

बँक कर्मचारी संपाच्या पार्श्वभूमीवर बँकिंग व्यवहारांवर मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे. डिजिटल व्यवहार आणि एटीएम सेवा कार्यरत राहतील, मात्र चेक क्लिअरन्स, कर्ज व्यवहार, कॅश डिपॉझिट आणि विथड्रॉवलसारखी सेवा प्रभावित होऊ शकतात.

संपाचा निर्णय कायम राहिल्यास काय करावे? :

– ग्राहकांनी महत्वाची बँकिंग कामे 22 मार्चच्या आधी पूर्ण करावीत.
– डिजिटल पेमेंट्स, यूपीआय, इंटरनेट बँकिंगचा पर्याय वापरण्याचा प्रयत्न करावा.
– मोठ्या आर्थिक व्यवहारांसाठी पर्यायी उपाय शोधावेत.
– बँक कर्मचारी संघटनांच्या मागण्यांवर सरकार आणि IBA कोणता निर्णय घेणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. जर चर्चा यशस्वी झाली नाही, तर देशभरातील बँकिंग व्यवहार 24 आणि 25 मार्चला ठप्प होऊ शकतात.

News Title: Bank Strike 2024: Banks to Remain Closed on March 24-25 Due to Nationwide Protest!

Join WhatsApp

Join Now

संबंधित बातम्या

अधिक चांगल्या अनुभवासाठी ही बातमी Chrome मध्ये उघडा! आपण सध्या Facebook च्या ब्राउझरमध्ये हे पेज पाहत आहात. कृपया वरच्या उजव्या कोपऱ्यातील तीन बिंदूंवर क्लिक करून Open in external browser पर्याय निवडा .