बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“दरेकरांनी आडनाव बदलून दरोडेखोर करावं”

मुंबई | यंदाचं अर्थसंकल्पीय अधिवेशन चांगलचं गाजताना दिसत आहे. विरोधक आणि सत्ताधाऱ्यांमध्ये आरोप प्रत्यारोप सुरू आहेत. त्यातच आता भाजप नेते तथा विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांच्यावर मुंबईत फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विरोधकांकडून प्रवीण दरेकर यांना लक्ष्य करण्यात येत आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी प्रवीण दरेकरांवर बोचरी टीका केली आहे.

प्रवीण दरेकरांनी बँक लुटली आहे. त्यामुळे दरेकरांनी आपले आडनाव बदलून दरोडेखोर करावं. हा गुन्हा योग्य पद्धतीने दाखल करण्यात आला आहे, असं नाना पटोले यांनी म्हटलं आहे. भाजपने महाविकास आघाडीच्या नेत्यांवर कारवाई केली तर ती सुडबुद्धी नसते. आता बँक लुटली गेली, दरोडा टाकला गेला. दरेकर आडनावाचं त्यांनी दरोडेखोर करून टाकलं आहे, असा घणाघात नाना पटोले यांनी केला आहे.

नाना पटोले यांनी बोलताना सुडभावनेने कारवाई केल्याचा आरोप फेटाळला आहे. हे सगळं ऑडिटमध्ये आलेलं आहे. सहकार विभागाने तो गुन्हा दाखल केलेला आहे. सहकार विभागाला अशा पद्धतीने सरकारी बँका लुटणाऱ्यांवर कारवाई करण्याचे अधिकार आहेत. त्यामुळे राजकीय सुडभावनेने कारवाई झाली आहे, असं म्हणणं चुकीचं ठरेल, असं नाना पटोले म्हणाले आहेत.

दरम्यान, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी बोलताना राज्य सरकारवर जोरदार टीका केली आहे. देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रवादीचे नेते गुलाबराव देवकर यांच्या नावाचा उल्लेख केला. तसेच प्रवीण दरेकर यांच्यावर दाखल करण्यात आलेला गुन्हा चुकीचा आहे. महाराष्ट्रातील कुठलीही मजूर संस्था काढा, अर्धे आमदार आहेत. सगळ्या पक्षाचे आमदार मजूर संस्थेचे अध्यक्ष आहेत, असा दावा देवेंद्र फडणवीसांनी केला आहे.

थोडक्यात बातम्या-

Russia Ukraine War: एलोन मस्कचं पुतीन यांना खुलं आव्हान, म्हणाले…

‘शैक्षणिक संस्थामध्ये हिजाब बंदी योग्य’; उच्च न्यायालयचा मोठा निर्णय

मुळशी पॅटर्नमधील ‘ती’ चहावाली अभिनेत्री आज कोट्यावधींची मालकीण, वाचा काय करतेय काम

IPL 2022: BCCI नं आयपीएल नियमांमध्ये केले ‘हे’ मोठे बदल

इंधन दरात काय बदल झाला?, वाचा आजचे ताजे दर

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More