बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

पीककर्ज घेताय का? असे असतील बँकांचे नवीन निकष; जाणून घ्या सविस्तर माहिती

मुंबई | रिझर्व बँकेने पीक कर्ज व दीर्घ मुदतीच्या कर्जासाठीच्या निकषांमध्ये बदल केले आहेत. बँकाकडून पीककर्ज घेण्यासाठी सात-बारा, आठ-अ, सहा-ड, पॅनकार्ड, आधारकार्ड अशा कागदपत्रांची गरज असते. परंतु आता त्यामध्ये बदल करण्यात आले आहेत. तसेच दुसरीकडे कोणत्याही बँकेत कर्ज नसल्याचे पुरावे द्यावे लागत होते. इतर कोणत्याही बँकेत, पतसंस्थेत, फायनान्स कंपनीत थकबाकी असलेल्या व्यक्तीला कर्ज दिले जात नाही.

पीककर्जासाठी आता ‘सिबील’ची पडताळणी बंधनकारक करण्यात आली आहे. रिझर्व बँकेने चार कंपन्यांसोबत करार केला आहे. या कंपन्यांच्या माध्यमातून सिबीलची पडताळणी केली जाणार आहे. एखाद्या व्यक्तीनं बाहेरील कोणत्या बँकेकडून कर्ज घेतले आहे किंवा कोणाच्या कर्जासाठी जामीन झाली आहे, याची सविस्तर माहिती समजणं सिबीलमुळं शक्य झालं आहे.

संबंधित व्यक्ती कोणत्या बँकेची थकबाकीदार आहे, ज्याला जामीनदार आहे, ती व्यक्ती वेळेवर कर्जाची परतफेड करते का? या सर्व बाबी सिबीलच्या माध्यमातून तपासल्या जातात. त्यामुळे आता पीककर्जासाठी सिबीलची पडताळणी बंधनकारक करण्यात आली आहे.

दरम्यान, कर्ज घेण्याची पत वाढावी आणि थकबाकी कमी व्हावी यासाठी सिबील तपासले जाते. बँकांनुसार सिबीलचे निकष वेगळे आहेत. बँक ऑफ इंडिया मधील ग्राहकांना 675 सिबील असेल तरच कर्ज मिळणार आहे. तर भारतीय रिझर्व बँक 600 पर्यंत सिबील असणाऱ्यांनाच कर्ज देणार आहे.

थोडक्यात बातम्या-

गरिबांना लुटणाऱ्यांना सरकार सोडणार नाही- पंतप्रधान नरेंद्र मोदी

काय सांगता! मृत्यूच्या 70 वर्षांनंतर देखील आजही अनेकांना जीवनदान देतेय महिला

भारत-पाकिस्तान सामना रद्द झाला तर काय होणार? वाचा काय सांगतो ICCचा नियम

उत्तराखंडमध्ये अतिवृष्टीने हाहाकार! तब्बल 46 जणांचा मृत्यू; मुख्यमंत्र्यांकडून मदत जाहीर

सुट्टी नाहीच! ड्रग्ज प्रकरणात आर्यन खानचा जामीन फेटाळला

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More