पुणे | 23 तारखेला लोकसभा निवडणुकांचे निकाल लागणार आहेत. मात्र काही उत्सुक कार्यकर्त्यांनी एक दिवस आधीच आपल्या भावी खासदारांचे बॅनर चौकाचौकात लावून ते खासदार झाले असल्याचं गृहीत धरलं आहे.
पुणे लोकसभा मतदारसंघाचे भाजपचे उमेदवार गिरीश बापट यांचे बॅनर निकालाच्या एक दिवस आधीच चौकात लावण्यात आले आहेत. खासदार झाल्याबद्दल कार्यकर्त्यांनी त्यांच अभिनंदनही केलं आहे.
शिरुर लोकसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादीचे उमेदवार अमोल कोल्हे यांचीही खासदार म्हणून फ्लेक्सबाजी करण्यात आली आहे. भिवंडीतील उमेदवारांसाठीही अशीच बॅनरबाजी करण्यात आली आहे.
दरम्यान, खरे निकाल हाती आल्यानंतर कार्यकर्त्यांचे भावी खासदार पडले नाहीत म्हणजे मिळवलं.
महत्वाच्या बातम्या
-शिरुर-मावळ मतदारसंघांवर तब्बल 1000 कोटींचा सट्टा; वाचा कुणाला किती भाव
-हिंसाचार करु नका; भीम आर्मीच्या इशाऱ्यानंतर प्रकाश आंबेडकरांचे कार्यकर्त्यांना आवाहन
-बारामतीत उद्या चमत्कार घडणारच; कांचन कुल यांना विश्वास
-पक्षाने तुम्हाला काय कमी केलं होतं???….; पुतण्याचा काकाला सवाल
-फक्त प्रकाश आंबेडकरांचा पराभव होऊ द्या; भाजपचे एकही कार्यालय ठेवणार नाही- भीम आर्मी
Comments are closed.