Top News

पुण्यात निकालाआधीच अरुण लाड यांच्या विजयाचे बॅनर्स झळकले!

पुणे | पुणे पदवीधर मतमोजणीला सुरुवात झाली आहे. यानुसार आता निकालांचा पहिला कल येण्यास सुरुवात झाली आहे. यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे अरुण लाड आघाडीवर असल्याचं पाहायला मिळत आहे. तर भाजपचे संग्राम देशमुख पिछाडीवर आहेत.

निकाल येण्यापूर्वीच महाविकास आघाडीचे उमेदवार अरुण लाड यांच्या विजयाचे फ्लेक्स पुण्यात झळकले आहेत. या बॅनरची शहरात सध्या जोरदार चर्चा सुरू आहे.

निकाल येण्यास जवळपास 40 तास लागतील असा अंदाज प्रशासनाने व्यक्त केला. मात्र, त्याआधी राष्ट्रवादीने अरुण लाड यांच्या विजयाचे बॅनर लावले आहेत.

दरम्यान, राज्यातील 3 पदवीधर आणि 2 शिक्षक मतदारसंघाच्या निकालाकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं आहे.

महत्वाच्या बातम्या-

राहुल गांधी यांच्यामध्ये सातत्याचा अभाव आहे; शरद पवारांचे स्पष्ट मत

भाजपने दुसऱ्याच्या घरात चोरी करुन विजय मिळवला- अशोक चव्हाण

बीएचआर घोटाळ्याशी माझा कोणताही संबंध नाही; गिरीश महाजन यांचं स्पष्टीकरण

“शेठजी लायटिंग छान होती आणि तुमचा डान्स तर लाजवाबच”

अमरीश पटेल यांचा विजय सत्ताधाऱ्यांसाठी मोठा राजकीय धक्का- गिरीश महाजन

 

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या