बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

वारीला बंदी हे द्रौपदीच्या पदराला हात घालण्याचं पाप- संभाजी भिडे

सातारा | कोरोना महामारीमुळे यंदाच्या वर्षीही पायीवारीवर निर्बंध लावण्यात आले आहेत. मात्र राज्य सरकारच्या पायीवारीच्या निर्बंधांना न जुमानता पंढरपूरच्या दिशेने निघालेल्या ज्येष्ठ कीर्तनकार बंडातात्या कराडकर यांना पिपंरी-चिंचवड पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं. त्यानंतर आता त्यांच्यावर झालेल्या या कारवाईमुळे शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान संस्थेकडून निषेध व्यक्त करण्यात आला आहे.

वारीला बंदी हे द्रौपदीच्या पदराला हात घालण्याचं पाप सरकार करत आहे, असा आरोप संभाजी भिडे यांनी केला आहे. वारीचा मुक्काम जिथं जिथं होतो, त्या त्या गावात परिसरातील लोकांनी येऊन एकत्र मुक्काम करा. पोलीस अडवतील पण विरोध मोडून काढा, असंही वादग्रस्त वक्तव्य संभाजी भिडे यांनी केलं आहे.

बंडातात्या कराडकर यांना पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर त्यांना स्थानबद्ध करण्यात आलं होतं. याच्या निषेर्धात शिवप्रतिष्ठान संघटनेने कराड येथे निषेध मोर्चा काढून संभाजी भिडे यांच्या उपस्थितीत कराड तहसीलदार यांना निवेदन देलं. जय जय राम कृष्ण हरी गजर करत त्यांनी हे आंदोलन केलं आहे.

दरम्यान, आषाढी वारीला परवानगी द्या, वारी होत नसल्यामुळे कोरोना वाढत आहे. त्यामुळे वारीला परवानगी द्या, म्हणजे कोरोना जाईल, अशी मागणी संभाजी भिडे यांनी केली होतं. मानाच्या पालख्यांचे वाहनातून प्रस्थान न करता मर्यादित वारकऱ्यांच्या उपस्थितीत पायी वारी झाली पाहिजे, असं भिडे म्हणाले होते.

थोडक्यात बातम्या-

ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरुन चर्चा तापली, सभागृहात विरोधकांचा जोरदार गोंधळ

विधानसभा अध्यक्षांच्या दालनात सत्ताधारी विरोधकांमध्ये धक्काबुक्की; कामकाज 10 मिनिटांसाठी तहकूब

“भागवतांनी हिंदू- मुस्लीम ऐक्यावर बोलणं म्हणजे RSSने सरड्याप्रमाणे रंग बदलणं”

‘सगळं कामकाज बाजूला ठेवा पण MPSC वर चर्चा घ्या’; फडणवीस आक्रमक

“170 आमदार असून काय उपयोग?, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंपेक्षा राहुल गांधी बरे”

Shree

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More