Top News पालघर महाराष्ट्र

बापटांनी घेतली पाटलांची फिरकी; पाटील म्हणाले… तर माझेच बारा वाजतील!

पुणे |  दिवंगत माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या जयंतीनिमित्त भूगाव येथे शेतकरी संवाद अभियानचं आयोजन केलं होतं. त्यावेळी भाजपचे खासदार गिरीश बापट यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष आणि आमदार चंद्रकांत पाटील यांची फिरकी घेतली.

चंद्रकांत पाटील यांचे भाषण सुरू असताना पंतप्रधानांचा कार्यक्रम प्रसारीत होण्याची वेळ झाली होती. त्यावेळी पाटील म्हणाले, ‘माझे घड्याळाकडे लक्ष आहे. त्यावेळी बापट म्हणाले, कोणत्या घड्याळाकडे लक्ष आहे.

पाटील म्हणाले, माझ्या हातातील घड्याळाकडे माझे लक्ष आहे. दुसऱ्या घड्याळाकडे लक्ष दिल्यास माझेच बारा वाजतील. यावर सर्वत्र जोरदार हशा पिकला.

शेतकऱ्यांचे खरे दु:ख मोदींने ओळखले. त्यामुळे शेतीचा पोत सुधारणे, धरणांचे अर्धवट प्रकल्प पूर्ण करणे, पीक विम्यात सुधारणा करणे, सहा हजार देऊन सावकारकी बंद केली, खते प्रत्येकाला मिळतील याबाबत कार्यवाही केली, असं चंद्रकांत पाटील म्हणाले.

थोडक्यात बातम्या-

मी परत जाईन, परत जाईन म्हणायला त्यांना कोणी बोलावलंही नव्हतं- अजित पवार

धक्कादायक! ‘या’ लोकप्रिय अभिनेत्याचा धरणात बुडून मृत्यू

देशात भाजपची तानाशाही सुरू आहे, विरोधकांनी एकत्र यायला हवं- संजय राऊत

धक्कादायक! राष्ट्रवादी काॅंग्रेसच्या नेत्यानेच केले एकनाथ खडसेंवर अत्यंत गंभीर आरोप

रूपाली चाकणकर यांचं कार्यालय पेटवून देण्याची धमकी!

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या