बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

डिस्को किंग काळाच्या पडद्याआड, सुप्रसिद्ध गायक बप्पी लाहिरी यांचं निधन

मुंबई | जेष्ठ गायक व संगीतकार बप्पी लाहिरी यांचं निधन झालं आहे. वयाच्या 69 व्या वर्षी बॉलिवूडच्या डिस्को किंगने मुंबईतील रूग्णालयात अखेरचा श्वास घेतला.

बप्पी दा या नावाने ओळखल्या जाणाऱ्या बप्पी लाहिरी यांनी आजपर्यंत अनेक लोकप्रिय गाणी दिली आहेत. 1970-80 च्या दशकातील बप्पी दा यांच्या आवाजातील डिस्को डान्सर गाणं आजही तितकच लोकप्रिय आहे.

गेल्या वर्षी बप्पी दा यांना कोरोनाची लागण झाल्याने मुंबईतील ब्रीच कँडी रूग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. काही दिवसांनंतर बप्पी दा कोरोनातूनही बरे झाले होते. अखेर बुधवारी बप्पी लाहिरी यांनी अखेरचा श्वास घेतला.

बप्पी लाहिरी यांनी भारतीय चित्रपटात डिस्को संगीताचा वापर लोकप्रिय केला. लता मंगेशकर, उषा उथुप, किशोर कुमार, मोहम्मद रफी यांच्यासारख्या अनेक लोकप्रसिद्ध गायकांसोबत काम केलं आहे.

थोडक्यात बातम्या-

प्रसिद्ध पंजाबी अभिनेता दीप सिद्धूचा भीषण अपघातात मृत्यू

संजय राऊतांच्या आरोपावर किरीट सोमय्या यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…

“असा तुरुंग अजून बनला नाही जो मला 2 वर्षे तुरुंगात ठेवू शकतो”

“चाटायचं असेल तेव्हा पवारसाहेब आणि चावायचं असेल तेव्हा…”

“शिवसेना सोडू नाहीतर दलालाला जोड्यानं मारु”; 19 बंगल्यांबद्दल राऊत संतापले

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More