‘काय झाडी, काय डोंगर, काय हाटेल…’, शिंदे सरकारमध्ये शहाजी पाटलांना मंत्रीपद मिळणार ?
मुंबई | काय झाडी, काय डोंगर, काय हाटेल…..एकदम ओके या संवादामुळे चर्चेत आलेले सांगोल्याचे आमदार शहाजी बापू पाटील यांना आता कोणतं मंत्रिपद मिळणार याची चर्चा आहे. एकनाथ शिंदेनी काल मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर आता कोणत्या नेत्याला कोणते खाते मिळणार हे पाहणं महत्वाचं आहे.
शहाजी पाटील यांच्यासह सोलापूर जिल्ह्यातील सुभाष देशमुख आणि विजयकुमार पाटील यांनाही मंत्रीपद मिळण्याची शक्याता आहे. सोलापूर जिल्ह्याला दोन कॅबिनेट आणि एक मंत्रीपद देण्याचा विचार केला जात आहे.
एकनाथ शिंदेच्या बंडखोर आमदारांपैकी शहाजी पाटील एक होते. एकनाथ शिंदे यांनी बंड पुकारल्यानंतर अगदी सुरवातीपासून शहाजी पाटील त्यांच्यासोबत होते. यामुळेच आता त्यांच्या निष्ठेचे फळ म्हणून शहाजी पाटील यांना मंत्रीपद मिळणार आहे.
दरम्यान, नवीन मंत्रिमंडळ उभं करत असताना नव्या चेहऱ्यांना संधी दिली जाणार असल्याची माहिती समोर येत आहे. बार्शीचे अपक्ष आमदार राजेंद्र राऊत, करमाळ्याचे अपक्ष आमदार संजय शिंदे यांचा विचार होऊ शकतो. तर आगामी विधानसभा निवडणुकीत यश मिळवण्यासाठी कोण महत्वाचे ठरेल याचाही विचार केला जाणार आहे.
थोडक्यात बातम्या
‘हा शिवसेनेचा मुख्यमंत्री नाही’; उद्धव ठाकरे अखेर स्पष्टच बोलले
“जगभरात लोकशाहीचा डंका वाजवत फिरायचं आणि आपल्याच…”
मोठी बातमी! सत्तेत येताच ठाकरे सरकारचे दोन निर्णय शिंदे-फडणवीसांनी बदलले
राज्यातील ‘या’ भागात मुसळधार पावसाची शक्यता; हवामान खात्याकडून ऑरेंज अलर्ट जारी
Comments are closed.