शरद पवारांचा भाजपला मोठा धक्का; पुण्यातील बडा नेता राष्ट्रवादीत प्रवेश करणार?

Sharad Pawar l महाराष्ट्रात विधानसभा निवडणूक अगदी काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. अशातच राज्यात राजकीय घडामोडींना देखील प्रचंड वेग आला आहे. अशातच आता विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार सध्या अॅक्टिव्ह मोडवर आहेत. कारण शरद पवार विधानसभा निवडणुकीसाठी भन्नाट अशी रणनिती आखत आहेत. अशातच आता भाजपचे वरिष्ठ नेते लवकरच राष्ट्रवादी गटात प्रवेश करणार आहेत अशी घोषणा करण्यात आली आहे.

नेमकं कोण जाणार पवार गटात? :

गेल्या काही दिवसांपूर्वी शरद पवारांनी कोल्हापूरमध्ये भाजपला मोठा धक्का दिला होता. कोल्हापूरमध्ये समरजित घाटगे यांनी भाजपला सोडचिठ्ठी देत राष्ट्रवादी शरद पवार गटात प्रवेश केला आहे. मात्र अशातच आता पुण्यात देखील भाजपचे वरिष्ठ नेते राष्ट्रवादी शरद पवार गटात प्रवेश करणार असल्याची घोषणा करण्यात आली आहे. त्यामुळे शरद पवार पुण्यात भाजपला धक्का देण्याच्या तयारीत असल्याचं चित्र दिसत आहे.

पुण्यातील वडगाव शेरीमध्ये भाजपला मोठा धक्का बसण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. कारण माजी आमदार आणि भाजपचे जेष्ठ नेते बापूसाहेब पठारे हे भाजपला रामराम करण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे बापूसाहेब पठारे यांची लवकरच घरवापसी होण्याची शक्यता आहे. बापूसाहेब पठारे हे हाती तुतारी घेणार असल्याचं त्यांनी एका गणपती मंडळाच्या कार्यक्रमात स्पष्ट केलं आहे.

Sharad Pawar l पुण्यात भाजपला धक्का बसणार :

बापूसाहेब पठारे सध्या भाजप पक्षामध्ये आहेत. मात्र सध्या राष्ट्रवादीचे दोन गट पडले आहेत. अजित पवार गट हा भाजपसोबत गेला आहे. तर राष्ट्रवादीचे सुनील टिंगरे हे वडगाव शेरीचे सध्याचे आमदार आहेत. त्यामुळे ही जागा अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडे जाण्याची दाट शक्यता आहे. कारण वडगाव शेरीची जागा भाजपकडे नसल्याने माजी आमदार बापूसाहेब पठारे हे नाराज आहेत.

अशातच त्यांनी आता थेट गणपती मंडळाच्या कार्यक्रमातूनच हाती तुतारी घेण्यात असल्याचे संकेत दिले आहेत. आगामी विधानसभा निवडणुकीत आपलं चिन्ह तुतारी असल्याचं बापूसाहेब पठारे यांनी स्पष्ट केलं आहे. त्यामुळे भाजपचे नेते बापूसाहेब पठारे हे लवकरच राष्ट्रवादी शरद पवार गटात प्रवेश करण्याची शक्यता आहे.

News Title –  Bapusaheb Pathare May Enter in NCP Sharad Pawar Group

महत्वाच्या बातम्या- 

कोथिंबीरच्या जुडीने खाल्ला भाव! एका जुडीची किंमत पाहून व्हाल थक्क

राज्यात आज मुसळधार! जाणून घ्या तुमच्या शहराला कोणता अलर्ट?

धक्कादायक! पुण्यात टेम्पो चालकाने मनसे पदाधिकाऱ्याच्या पत्नीला चिरडलं, जागीच मृत्यू

“त्यांना लिजेंड आणि मला शिव्या..”; गीतकार गुलजार यांच्याबद्दल हनीसिंहचं वादग्रस्त वक्तव्य

सोनं पुन्हा झालं स्वस्त, जाणून घ्या आजचे लेटेस्ट दर