Top News महाराष्ट्र मुंबई

“शेतकरी कायद्यांना विरोध करणाऱ्यांनो… हा दुटप्पीपणा किळसवाणा आहे”

मुंबई | राष्ट्रवादी काँग्रेसकडून मोदी सरकारने आणलेल्या शेतकरी कायद्यांना विरोध केला जात आहे. अशाच पार्श्वभूमीवर रोहित पवार यांच्या बारामती अॅग्रोच्या कॉन्ट्रॅक फार्मिंगचे काही फोटो सोशल मीडियात व्हायरल झाले आहेत. त्यामुळे त्यांच्यावर टीका केली जात आहे.

भाजपने देखील रोहित पवार यांना याच मुद्द्यावरुन लक्ष्य केलं आहे. शेतकरी कायद्यांना विरोध करणाऱ्या राजकारणी मंडळींच्या कॉन्ट्रॅक फार्मिंग कंपन्यांचे बॅनर पाहून आनंद झाला. हा दुटप्पीपणा किळसवाणा आहे, असं भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी म्हटलं आहे.

अतुल भातखळकर यांनी केलेलं ट्विट-

सोशल मीडियावर हे पोस्टर्स शेअर्स करत अनेकांनी पवार कुटुंबियांवर तसेच राष्ट्रवादी काँग्रेसवर टीका केली आहे. एकीकडे शेतकरी कायद्यांना विरोध करायचा आणि दुसरीकडे मात्र त्याच शेतकरी कायद्यातील तरतूदींनूसार आपल्या कंपनीद्वारे कॉन्ट्रॅक फार्मिंग करायचं, अशा प्रकारे प्रतिक्रिया पहायला मिळत आहेत.

 

 

 

थोडक्यात बातम्या-

पोलिसांसाठी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केली ‘ही’ मोठी घोषणा

राहुल गांधींनी शिवसेनेला जागा दाखवली- अतुल भातखळकर

लेकीला शिकवा, तिच्या पंखांना बळ द्या- अमृता फडणवीस

“कुणाला काय द्यायचं ते द्या, पण आमच्या हक्काचं आम्ही सोडणार नाही”

मनसे आमदार राजू पाटील नितीन गडकरींच्या भेटीला!

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या