बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

…अन् भररस्त्यात तो वाजले की बारावर थिरकला; रिक्षावाल्याच्या लावणीवर तुम्हीही व्हाल फिदा, पाहा व्हिडिओ

पुणे | बारामतीच्या एका रिक्षाचालकाने भररस्त्यात आपल्या मित्रांच्या मागणीवर मराठी लावणीवर ठेका धरत अगदी एखाद्या लावणीसम्राज्ञीला लाजवेल असं नृत्य सादर करून दाखवलं आहे. आपण आतापर्यंत महिलांना आणि मुलींना एखाद्या सांस्कृतिक कार्यक्रमात नृत्यामध्ये सक्रिय सहभाग घेतलेलं पाहिलं आहे.  पण या रिक्षाचालकाने केलेल्या मनमोहून टाकणाऱ्या नृत्याने समाजमाध्यमावर चांगलीच हवा केली आहे.

बारामती शहरात रिक्षा चालवणाऱ्या बाबजी कांबळे यांना नृत्याची आवड आहे आणि ती आवड जोपासण्याचा पुरेपुर प्रयत्न ते करत असतात. एकदिवस सहकारी मित्रांच्या मागणीवरून रिक्षा स्टॅंडवरच त्यांनी “मला जाऊ दया ना घरी ,आता वाजले की बारा” या मराठी लावणीवर आपला नृत्याविष्कार दाखवला आहे.

कांबळे यांच्याच मित्रांनी या दरम्यान हे क्षण आपल्या मोबाईलमध्ये कैद केले आणि सोशल मिडियावर शेअर केेले. त्यानंतर बघता बघता त्यांच्या या व्हिडिओवर लाईक्स आणि कमेंट्सचा पाऊस पडायला सुरूवात झाली.  तसेच हा व्हिडिओ संपुर्ण महाराष्ट्रातील लोकांच्या पसंतीस पडला.

मुळचे बारामतीला लागुनच असलेल्या गुणवडी गावचे बाबजी कांबळे हे रहिवासी आहेत. तसेच ते गुणवडी गावचे ग्रामपंचायत सदस्यही असल्याचं समजतंंय. सर्वगुणसंपन्न आणि एक हरहुन्नरी व्यक्तिमत्व म्हणुन कांबळे यांची ओळख आहे. त्यांच्या या लावणी व्हिडिओने संपुर्ण महाराष्ट्राला वेड लावलं असून आत्तापर्यंत वेगवेगळ्या माध्यमातुन लाखो लोकांनी त्यांचा व्हिडिओ पाहुन त्याला पसंती दर्शवली आहे.

पाहा व्हिडिओ- 

 

थोडक्यात बातम्या-

…अन् अशाप्रकारे कुख्यात गुंड गजा मारणे पुन्हा पोलिसांच्या जाळ्यात अडकला!

ज्येष्ठ अभिनेते श्रीकांत मोघे काळाच्या पडद्याआड; मराठी सिनेसृष्टीवर शोककळा…

पाकिस्तानात हिंदू कुटुंबावर जीवघेणा हल्ला, 5 जणांचा जागीच मृत्यू

“आमदारकीसाठी नव्हे तर शेतकऱ्याला योग्य दाम मिळावा म्हणून आंदोलन”

‘देवदूतच ठरला यमदूत’! पैसे नसल्याने डॉक्टरांनी चिमुरडीचं शिवलं नाही पोट अन्…

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More